नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाकडून सातत्याने होत असलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे संतप्त झालेल्या एका फुटपाथवरील हॉकरने महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्तांच्या कक्षातच कपड काढून मनस्ताप व्यक्त केला.
दोन दिवसांपूर्वी व्हीसीएच्या भागात अतिक्रमण विभागाने कारवाई केली. या कारवाईत फुटपाथवरील ठेले जप्त करण्यात आले. या कारवाई पीडित युवकाचाही ठेला होता. तो चना-पोह्याचा ठेला लावत होता. अतिक्रमण पथकाने ठेलाच उचलून नेल्याने तो संतप्त झाला. तो महापालिकेच्या मुख्यालयात आला. अतिक्रमण विभागाच्या सहा. आयुक्तांकडे ठेला देण्याची मागणी करू लागला. दरम्यान अधिकारी व त्याच्यामध्ये तुतु-मैमै झाली. अधिकाऱ्यांनी ठेला परत करण्यास नकार दिल्याने त्याने संतप्त होवून अधिकाऱ्यापुढेच कपडे काढून आमचा रोजगार हिसकावू नका, अशी ओरड केली.
दरम्यान पोलीसांना सूचना देण्यात आली. पोलीस आल्यानंतर त्याने आपली व्यथा पोलीसांना सांगितली. मी शिक्षित असून, नोकरी मिळत नसल्याने ठेला लावून दोन पैसे कमवितो. पण वारंवार होणाऱ्या कारवाईमुळे मला रोजगारही करता येत नाही.