शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

सरकारी कर्मचाऱ्याची खदखद व्यक्त करणारे पत्र सोशल मिडियावर व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 7:48 PM

Nagpur News सरकारने जुनी पेंशन लागू करण्यासंदर्भात चालढकल अवलंबिल्याची भावना झाल्यामुळे सरकारी कर्मचारी शक्य होईल त्या पद्धतीने आपली खदखद व्यक्त करीत आहेत. एका कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री सहायता निधीत आपले एक दिवसाचे वेतन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

 नरेश डोंगरे

नागपूर : सरकारने जुनी पेंशन लागू करण्यासंदर्भात चालढकल अवलंबिल्याची भावना झाल्यामुळे सरकारी कर्मचारी शक्य होईल त्या पद्धतीने आपली खदखद व्यक्त करीत आहेत. एका कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री सहायता निधीत आपले एक दिवसाचे वेतन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या संबंधाने त्याने आपल्या वरिष्ठांना पत्र लिहून वेतन न देण्यामागची भूमिका मांडली आहे. त्याचे हे पत्र सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

राज्यात पावसामुळे उद्भवणाऱ्या आपत्तीग्रस्त नागिरकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधित राज्य सरकारमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी माहे जून - २०२३ मधील आपले एक दिवसाचे वेतन उपलब्ध करून द्यावे, असे आदेश सरकारने नुकतेच निगर्मित केल्याचे समजते. या निर्णयाला हरकत घेऊन 'या' कर्मचाऱ्याने प्रशासकीय अधिकाऱ्याला एक पत्र लिहिले आहे. या पत्रातील मजकूर काहीसा भावनिक आहे. 'मी नवीन पेंशन धारक असून मला निवृत्तीनंतर जुनी पेंशन लागू नसल्यामुळे माझे स्वत:चे भवितव्य अंधकारमय झाले आहे. त्यामुळे मी ईतरांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यास सक्षम नाही. मुंबईसारख्या महानगरात मला मिळत असलेल्या वेतनात माझा दैनंदिन खर्च भागविणे आणि काैटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे माझ्यासाठी जिकरीचे होत आहे. त्यामुळे माहे जून २०२३ च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत देणगी म्हणून उपलब्ध करून देण्यास आपला विरोध आहे', असे त्या कर्मचाऱ्याने पत्रात लिहिले आहे. आपले एक दिवसाचे वेतन कपात करू नये, अशी विनंतीही त्याने या पत्रातून केली आहे. हे पत्र आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत त्याने वरिष्ठांना पाठविले आहे. त्याची पोचही (रिसिव्ह कॉपी) घेतली आहे. ही कॉपी आता बांद्यापासून चांद्यापर्यंतच्या विविध शासकीय कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर व्हायरल होत आहे.

चर्चा अन् तिखट प्रतिक्रिया'एकच मिशन - जुनी पेंशन' असा नारा देऊन मध्यंतरी सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध आंदोलने केली. धरणे-निदर्शने करून निषेधही नोंदवला. मात्र, सरकारकडून मागणी मान्य न झाल्याने त्यांच्यात चांगलाच रोष आहे. वेळोवेळी ते उघडउघड बोलून रोष व्यक्तही करतात. आता हे पत्र व्हायरल झाल्याने जुनी पेंशनचा विषय पुन्हा एकदा सोशल मिडियावर जोरात चर्चेला आला आहे. या संबंधाने अनेक जण विविध व्हॉटस्अप ग्रुपवर पत्राच्या कॉपीसह तिखट प्रतिक्रिया नोंदवून आपली खदखदही व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल