आनंद डेकाटे नागपूर : बुद्ध पोर्णिमेनिमित्त ड्रॅगन पॅलेस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी भिक्खूसंघाच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच १०० मीटर लांब असलेल्या पंचशील ध्वजेसह शांतिमार्च काढण्यात आला.
ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख सुलेखा कुंभारे यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेण्यात आली. यानंतर पंचशील शांतिमार्च काढण्यात आला. याचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीलंका येथून १०० मीटर लांब पंचशीलेचा ध्वज मागवण्यात आला होता. हा १०० मीटर ध्वज घेऊन शांतिमार्च निघाला. यात शेकडो, विद्यार्थी, शिक्षक व उपासक उपासिका सहभागी झाले होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशाधन केंद्र येथे असलेल्या परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पूतळयाला माल्यार्पण व अभिवादन करून मार्चचे समापण करण्यात आले. यासोबतचड्रॅगन पॅलेस परिसरातील विपस्सना मेडिटेशन सेंटर येथे शनिवारी एक दिवसीय सामुहिक ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.