नागपूर : मंगळवारी सकाळी वाघाच्या मृत्युची घटना समाेर आल्यानंतर आज वाघाने हल्ला करीत शेतकऱ्याला ठार केल्याची माहिती समाेर आली आहे. रामटेक तालुक्यातील पवनी वनपरिक्षेत्राअंतर्गत टुयापार बिटमध्ये जमुनिया या गावी घडली. हा व्यक्ती मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे शेत राखणीला शेतावर गेले हाेते.
सुखराम गुंटू सर्याम (५५) असे मृतक व्यक्तिचे नाव असून टुयापार (जमुनिया) येथील रहिवासी आहेत. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार सुखराम सर्याम हे १५ ऑक्टाेबरला नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान शेत राखणीला गेले हाेते. येथील शेतकरी पुंडलिक इडपाची यांच्या शेताच्या पायवाटेवरून जात असताना जवळच्या शेतात लपलेल्या वाघाने सुखराम सर्याम यांच्यावर हल्ला करून ठार केले असल्याचे सांगण्यात येत आहे. वाघाने त्यांच्या शरीराचे तुकडे केले हाेते. सकाळी शेतकरी शेतावर गेले असताना त्यांना मृतक सर्याम यांचा पाय दिसून आला. धड जवळपास नव्हते. पाहणी केली असत वाघाने फरफटत नेले असलेले त्यांचे धड दूरच्या शेतात आढळून आले. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे शेतावर विखुरले असल्याचे दिसून आले. ही घटना उघडकीस आल्याने ग्रमास्थांमध्ये दहशत आणि राेषही पसरला आहे.
१० दिवसात दाेघे ठारयाच महिन्याच्या ६ तारखेला बेलदा बिटमधील खानोरा येथील राजकुमार खंडाते यांच्यावरही वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले होते. अवघ्या १० दिवसांत दुसरी घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये दहशत आणि संतापाचे वातावरण आहे. वाघ दररोज माणसांवर व पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहेत. पवनी देवलापार परिसरात वाघ व वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, लोक आपल्या शेतात जाण्यास घाबरत आहेत.