शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
3
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
4
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
5
"माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
6
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
7
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
8
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
9
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
10
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
11
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
12
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
13
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
14
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
15
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
16
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली
17
ट्रम्प जिंको अथवा हॅरीस...; अमेरिकेच्या राष्ट्रपतीला किती मिळणार सॅलरी? सोबतच या खास सुख-सुविधाही मिळणार
18
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
19
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं

अबब...सहा हजार किलोच्या कढईत बनला विक्रमी चिवडा, विष्णू मनोहरांचा जागतिक खाद्य दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम

By मंगेश व्यवहारे | Published: October 16, 2022 5:12 PM

Vishnu Manohar: प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी खास पद्धतीने चिवडा बनविला. जागतिक खाद्य दिनानिमित्त या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहा हजार किलोच्या कढईत तयार केलेला चिवडा नक्कीच विश्वविक्रमी ठरला.

- मंगेश व्यवहारेनागपूर : दिवाळीत चमचमीत फराळाची रेलचेल असते. आता घरोघरी चिवडा आणि फराळाला सुरुवात होणार आहे. महिलांना नावीन्यपूर्ण चिवडा बनविण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ‘विष्णूजी की रसोई’ येथे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी खास पद्धतीने चिवडा बनविला. जागतिक खाद्य दिनानिमित्त या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहा हजार किलोच्या कढईत तयार केलेला चिवडा नक्कीच विश्वविक्रमी ठरला.

आयोजनस्थळी विष्णू मनोहर यांच्या रेसिपीच्या फॅन्स खास करून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रसोईमधील खुल्या रंगमंचावर या उपक्रमाचे आयोजन केले होते. पहाटेपासूनच त्यासाठी लगबग सुरू झाली होती. ६०० किलो चिवडा, ४०० किलो तेल, १०० किलो शेंगदाणे, १०० किलो काजू, ५० किलो किसमिस, २५० किलो मसाले हे साहित्य यासाठी वापरण्यात आले होते. ६००० किलोच्या कढईत बसेल एवढा चिवडा येथे तयार करण्यात आला. या उपक्रमाला कांचनताई गडकरी, एसीपी अशोक बागूल, माजी महापौर संदीप जोशी, आशुतोष शेवाळकर, राजे मुधोजी भोसले, आमदार विकास कुंभारे, डॉ. उदय बोधनकर आदी उपस्थित होते.

सामाजिक संस्थांना व गरीब कुटुंबांनाही वाटप- हा चिवडा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गडचिरोली, मेळघाटसारख्या दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांपर्यंत पोहचवला जाणार आहे. त्याचबरोबर शहरातील अनाथालय, अंध विद्यालयातही त्याचे वितरण होणार आहे.

टॅग्स :Vishnu Manoharविष्णु मनोहरfoodअन्नDiwaliदिवाळी 2022nagpurनागपूर