लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी लागणारी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी महावितरणला राज्याची नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणच्या पुढाकाराने नागपूर परिमंडलात एकूण ६५ चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. यात महावितरणच्या स्वतःच्या नागपूर शहरातील ६ चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे, याशिवाय नागपूर जिल्ह्यातील ५३ आणि वर्धा जिल्ह्यातील ६ खासगी चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे. या स्टेशन्सवर चार्जिंग करणाऱ्या वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे.
नागपूर शहरातील गांधीबाग विभागात कळमना आणि मेयो येथील ३३ केव्ही उपकेंद्रात, महाल विभागातील मॉडेल मिल उपकेंद्रात तर सिव्हील लाईन्स विभागातील नारा, एमआरएस आणि बिजलीनगर उपकेंद्र येथे महावितरणची स्वत:ची चार्जिंग स्टेशन्स आहेत…
असे आहेत इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सनागपूर परिमंडल – एकूण ६५ नागपूर शहर मंडल एकूण ४६ : यामध्ये बुटीबोरी विभाग ६, हिंगणा उपविभाग – २, एमआयडीसी (१) उपविभाग – ६, सिव्हील लाईन्स विभाग – ४, लष्करीबाग उपविभाग – २,एमआरएस उपविभाग – ४, कॉग्रेसनगर विभाग हुडकेशवर उपविभाग – ३, रिजंट उपविभाग – ६, शंकरनगर उपविभाग – ३, त्रिमुर्तीनगर उपविभाग – २, गांधीबाग विभाग वर्धमान उपविभाग – ५, महाल विभाग मानेवाडा उपविभाग – १, सुभेदार उपविभाग – १, तुळशीबाग उपविभाग – ३ .
- नागपूर ग्रामिण मंडल एकूण १३ : यामध्ये कोंढाळी ग्रामिण उपविभाग – २, कामठी शहर उपविभाग –३, कन्हान उपविभाग – २, मौदा उपविभाग – २, रामटेक उपविभाग - २ ,सावनेर विभाग खापरखेडा उपविभाग – १, सावनेर उपविभाग - १,- वर्धा मंडल – ६