नागपूर : आपण वाहनाने जात असताना रस्त्यावर जरी साप दिसला तरी थरकाप उडताे पण नागपुरात एका महिलेच्या माेपेडच्या हेडलाईटमधून साप निघाल्याची थरारक घटना घडली. वाठाेडा परिसरात इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी काढताना हेडलाईटच्या गॅपमधून साप निघाला. महिलेने तातडीने गाडी थांबविली व सर्पमित्राच्या मदतीने हा साप काढण्यात आला. साप काढतानाचा हा व्हिडीओ सध्या साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सीमा ढुलसे नामक ही महिला मंगळवारी दुपारी १२ वाजताच्यादरम्यान बॅंक याेजनेच्या कलेक्शनच्या कामासाठी वाठाेडा स्थित प्रधानमंत्री आवास याेजनेच्या इमारतीत गेली हाेती. त्या एमएच-४९, आर-२४५९ या क्रमांकाच्या माेपेडने कलेक्शनसाठी गेल्या हाेत्या. इमारतीच्या पार्किंगमध्ये गाडी थांबवून कलेक्शनसाठी गेल्या. काम झाल्यावर परतल्यानंतर आपली गाडी काढत असताना त्यांना हेडलाईटच्या गॅपमध्ये त्यांना सापाची शेपटी दिसली. त्यांनी लागलीच गाडी थांबविली आणि सर्पमित्र लक्की खडाेदे, सतीश जांगडे, धीरज मेश्राम यांना सुचित केले. त्यांनी घटनास्थळी येऊन त्या सापाला हेडलाईटमधून बाहेर काढले. साप बाहेर काढतानाच हा व्हिडीओ साेशल मीडियावर खुप व्हायरल हाेत आहे. गाडी काढताना लगेच साप दिसल्याने बरे झाले. धावत्या गाडीत हेडलाईटवर साप आला असता तर भीतीमुळे अपघात हाेण्याची शक्यता हाेती, अशी चर्चा आहे.