उमरेड : एकाच वेळी एकाच व्यासपीठावर ५१ महिलांचा सन्मान करणारा अनोखा सोहळा उमरेडच्या महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा तथा नगर परिषद उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने पं. दीनदयाल नाट्य सभागृहात आयोजित करण्यात आला होता. विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान महिला दिनानिमित्त करण्यात आला. लोकमतसखी डॉट कॉम या सोहळ्याचे डिजिटल मीडिया पार्टनर होते.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या छत्राखाली समाजातील महिला, तरुण व ज्येष्ठांना एकत्रित करण्याचे काम महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश एन. वैद्य यांनी केले. उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे या सोहळ्याला प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उपाध्यक्ष विदर्भ महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना वनकर, कृपाल तुमाने, सुप्रिया बावनकुळे, लोकमतच्या पत्रकार सुरभी शिरपूरकर, चंद्रभान खंडाईत, उमरेड नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश खवले, सुधीर पारवे, गंगाधरराव रेवतकर, जगदीश एन. वैद्य, संजय मेश्राम, सुषमा लाखे, शालिनी तेलरांधे, प्रज्ञा बडवाईक, नंदकिशोर दंडारे, पुष्कर डांगरे, हरिश्चंद्र दहाघाने, संजय घुगुसकर, संदीप इटकेलवार, उमरेड पंचायत सभापती गीतांजली नागभीडकर, जयश्री देशमुख, संगीता पडोले असे अत्यंत प्रसिध्द मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
२१ महिलांनी अतिशय सुंदर स्वागत गीत गात कार्यक्रमाला प्रारंभ केला. कर्तबगार पूजनीय महिलांच्या वेशात महिला सहभागी झाल्या. यावेळी अतिशय देखण्या रांगोळ्या आणि पुष्परचनाही करण्यात आल्या होत्या. परिसरातील महिला कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. कर्तबगार महिलांचा सन्मान आणि स्त्रियांना उत्तम व्यासपीठ या कार्यक्रमाने उपलब्ध करुन देण्यात आले. सन्मान करण्यासाठी खऱ्या अर्थानं कर्तबगार महिलांचा शोध आणि त्यांना व्यासपीठ असा दोन्हींचा अनोखा मिलाफ साधण्यात आला.
याच माध्यमातून जमलेल्या महिलांसाठी पैठणी जिंका स्पर्धा घेण्यात आली. यासाठी आयोजकांनी उपस्थित महिलांना एक कुपन दिले होते. त्या कुपनप्रमाणे लकी ड्रा पद्धतीने काढण्यात आला. पैठणीच्या मानकरी ठरणार होत्या ५ महीला . त्या ५ विजेत्यांना मानाची पैठणी देण्यात आली. सर्व उपस्थित महिलांनी सहभोजनाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर विभागाचे विभागीय अध्यक्ष जगदीश एन. वैद्य यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी वासुरकर, सुरेखा गोल्हर व आकाश लेंडे यांनी केले. आभार महिला आघाडी अध्यक्ष गीता आगासे यांनी मानले. श्रावण गवळी, यशवंत वंजारी, प्रभाकर बेले, प्रवीण गिरडे, रोशन झोडे, गणेश वासुरकर, चेतन दांडेकर, ज्ञानेश्वर घंघारे, राम वाघमारे, भूमीपाल पडोळे, संजय दाढे, दत्तू जीभकाटे, ओमप्रकाश आगासे, पोपेश्वर गिरडकर, रुपेश गिरडे, गणपत हजारे, मनीषा मुंगले, सोनाली चंदनखेडे, लता बेले, राजश्री भुसारी, मनीषा येवले, मीना दहाघाणे, संध्या वैद्य, वैशाली बांद्रे, चैताली वंजारी, सोनल बालपांडे, रेखा मुळे, वर्षा गिरडे, हर्षा वाघमारे, शालू झाडे, रेखा भुसारी, वर्षा वंजारी, माधुरी पडोळे, अंकिता लेंडे, स्नेहल वैद्य यासाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेहनत घेतली.