५० दिवसांतच पतीला सोडणाऱ्या पत्नीस मिळाली ७५०० रुपये खावटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 06:54 PM2022-10-10T18:54:18+5:302022-10-10T18:55:09+5:30

Nagpur News लग्नानंतर केवळ ५० दिवसांमध्ये पतीला सोडून माहेरी निघून गेलेल्या पत्नीस मासिक सात हजार ५०० रुपये अंतरिम खावटी मंजूर करण्यात आली.

A wife who leaves her husband within 50 days received Rs. 7500 as alms | ५० दिवसांतच पतीला सोडणाऱ्या पत्नीस मिळाली ७५०० रुपये खावटी

५० दिवसांतच पतीला सोडणाऱ्या पत्नीस मिळाली ७५०० रुपये खावटी

Next
ठळक मुद्दे शारीरिक छळाचा आरोप

नागपूर : लग्नानंतर केवळ ५० दिवसांमध्ये पतीला सोडून माहेरी निघून गेलेल्या पत्नीस मासिक सात हजार ५०० रुपये अंतरिम खावटी मंजूर करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.

प्रकरणातील पत्नी नागपूर तर, पती पुणे येथील रहिवासी आहे. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी नागपूर कुटुंब न्यायालयाने पत्नीला मासिक १० हजार रुपये अंतरिम खावटी मंजूर केली होती. त्याविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेता कुटुंब न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशात बदल केला व खावटीमध्ये समतोल साधून पत्नीस मासिक ७ हजार ५०० रुपये मंजूर केले. या दाम्पत्याचे ९ नोव्हेंबर २०१९ रोजी लग्न झाले होते.

असे होते पत्नीचे म्हणणे

पती व सासरची मंडळी लग्न झाल्यापासूनच हुंड्यासाठी शारीरिक-मानसिक छळ करीत होते. त्यामुळे माहेरी जावे लागले. सध्या पालकांच्या आधारावर जीवन जगत आहे. उत्पन्नाचा काहीच स्त्रोत नाही. पती खासगी कंपनीत कार्यरत असून, त्याला वार्षिक १३ लाख ३२ हजार रुपये वेतन मिळते, असे पत्नीचे म्हणणे होते.

पतीने आरोप अमान्य केले

पतीने पत्नीचे सर्व आरोप अमान्य केले. पती पालनपोषण करीत नाही, यासह इतर सर्व आरोप खोटे आहेत. पती सध्या एका खासगी कंपनीत ३० हजार रुपये मासिक वेतनाने काम करीत आहे. पत्नी लघुचित्रपट, शिकवणी वर्ग, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व बँक एजन्ट म्हणून पैसे कमविते, असे न्यायालयाला सांगण्यात आले.

Web Title: A wife who leaves her husband within 50 days received Rs. 7500 as alms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.