नागपूर : मुलाकडे दिल्लीला गेलेल्या महिलेच्या घरातील रोख व दागीने असा एकुण २ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेला. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३० मार्च २०२४ ते २२ जून २०२४ दरम्यान घडली. सरोजराणी सुरेश सिंग (६१, रा. विरचक्र कॉलनी, काटोल रोड गिट्टीखदान) या आपल्या घराला कुलुप लाऊन मुलाकडे दिल्ली येथे गेल्या होत्या.
अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने बेडरुममधील आलमारीतील सोन्याचे दागीने, रोख ५० हजार असा एकूण २ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सरोजराणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु करण्यात आला आहे.