शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

बुकी बाजारातील विश्वविक्रम, फायनलवर ६५ ते ७० हजार कोटींचा सट्टा; सट्टा बाजार प्रचंड गरम

By नरेश डोंगरे | Published: November 19, 2023 9:32 PM

एका सामन्यावर एवढ्या प्रचंड रकमेचा सट्टा पहिल्यांदाच

नरेश डोंगरेनागपूर : आयसीसी विश्व चषकाच्या फायनल मॅचवर बुकीबाजारात तब्बल ६५ ते ७० हजार कोटींचा सट्टा लागला होता, अशी धक्कादायक माहिती संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे. क्रिकेट सट्टेबाजीच्या इतिहासात एका सामन्यावर एवढ्या प्रचंड रकमेचा सट्टा पहिल्यांदाच लागला होता. बुकीबाजारातील हा एक नवाच विक्रम असल्याचेही बुकी बाजारातील सूत्रांनी सांगितले आहे.

गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये देश-विदेशातील १ लाख, ३२ हजार क्रिकेट रसिकांच्या साक्षीने रविवारी १९ नोव्हेंबरला विश्वचषकाची फायनल मॅच खेळली गेली. या मॅचमध्ये भारतीय संघ कांगारूची शिकार करणार की कांगारू शिकारी ठरणार, असा उत्कंठावर्धक प्रश्न क्रिकेट विश्वाला पडला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय बुकी बाजाराने विश्वविजेता म्हणून भारतीय संघाकडेच बोट दाखविले होते. पहिली इंनिंग सुरू असताना भारतीय संघाला एक रुपयाच्या बदल्यात ४६ पैसे तर ऑस्ट्रेलियाला ४८ पैसे भाव होता. अर्थात भारत जिंकणार म्हणून बुकीकडे कुणी एक हजार रुपये लावत असेल तर भारतीय संघ जिंकल्यास त्याला केवळ ४६० रुपये मिळणार, याऊलट ऑस्ट्रेलिया जिंकण्याचा दावा करणाऱ्यांना ४८० रुपये लावले तर १ हजार रुपये मिळणार. मात्र, जस-जसा सामन्यातील रोमांच वाढला तसतसे भाव कमी जास्त होत गेले. दुबई आणि बँकाँकमधून संचलित होणाऱ्या बुकीबाजारात मध्य भारतातील नागपूर, इंदोर, भोपाळ, जबलपूर, रायपूर आणि या सेंटरशी कनेक्ट असलेल गोवा, मुंबई हे सर्व सेंटर मॅच अखेरपर्यंत चांगलेच तापून होते, असेही सुत्रांनी सांगितले.

दोन्ही इनिंगमध्ये अनेकदा 'कलर'

मॅचमध्ये जेव्हा अनपेक्षित घडामोडी घडतात आणि बुकींचे अंदाज चुकतात तेव्हा त्याला बुकींच्या भाषेत कलर येणे म्हणतात. या मॅचच्या दोन्ही इनिंगमध्येही अनेकदा कलर आले. या सामन्यात पहिली खेळी करणारा संघ किमान २५० रन बनवेल असा बुकींचा अंदाज होता. त्यामुळे २५० ते ३३० धावांसाठी ३० पैसे भाव देण्यात आला होता. मात्र तो चुकला, हेच काय ३०० ते ३५० धावांसाठी ४५ पैसे, ३५० ते ४०० धावा ६० पैसे आणि ४०० पेक्षा जास्त धावांवर ८० पैसे भाव देण्यात आला होता. मात्र, हे सगळेच अंदाज चुकले. भारत केवळ २४० धावांवरच थांबला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दोन विकेट जाताच पुन्हा सट्टाबाजारात कलर आला. भावांतही उलटफेर झाले.

हाैसेपोटी लावला सट्टा

विश्वचषकाच्या सामन्यात कांगारूची शिकार होणार की कांगारू शिकारी ठरणार, यावर ठिकठिकाणी जोरदार चर्चा झाली. विशेष म्हणजे, ज्यांनी आजपर्यंत कधीच सट्टा लावला नाही अशा असंख्य नवख्यांनीही आपापल्या मित्रांच्या माध्यमातून छोट्या छोट्या रकमेचा सट्टा लावला. काहींनी आपल्या मित्रांसोबत पैशांची पैज लावली तर काहींनी 'पार्टी'च्या रुपातही विश्वचषकाच्या सामन्यावर 'भारतीय संघ'च जिंकेल म्हणून पैज लावली होती.

घरी जमविलेल्या बैठकांमध्येही पैज

दिवाळीच्या निमित्ताने घरची मंडळी किंवा भाऊबिजेच्या निमित्ताने पत्नी बाहेर गेल्याची संधी साधून अनेकांनी आपल्या मित्रमंडळींना घरीच बोलवून घेतले. त्यांनी छान घरच्या टीव्हीवर मित्रांसोबत 'साग्रसंगीत मैफल (खाणे-पिणे करत) जमविली. अर्थात या बैठकांमध्ये मित्रामित्रांनी पैज लावली होती. तर, काही सोसायट्यांमध्ये क्रिकेट प्रेमींनी स्क्रिन लावून समोसे-मिरची आणि 'शितपेयाचे कॅरेट' सोबतीला ठेवून या ऐतिहासिक क्रिकेट मॅचचा आनंद लुटला.