शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

ठकबाज सोंटू जैनने फसविलेल्या तरुणाची गोंदियात आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 10:26 AM

लाखोंची फसवणूक झाल्याने ‘नवीन’ने उचलले टोकाचे पाऊल; सोंटूकडून मोबाइलमधील डेटाही नष्ट

नागपूर : ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून नागपुरातील व्यापाऱ्याची ५८ कोटींची फसवणूक करणाऱ्या अनंत ऊर्फ सोंटू जैन याच्यामुळे गोंदिया येथील नवीन नावाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. तरुणाच्या कुटुंबीयांना शांत करण्यासाठी सोंटूने एक कोटी रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांच्या तपासात ही बाब समोर आली आहे. याबाबत शहर पोलिसांनी गोंदिया पोलिसांना माहिती दिली आहे.

सोंटूविरोधात नागपूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी धाड टाकण्याअगोदर सोंटू दुबईला फरार झाला होता. अटक टाळण्यासाठी त्याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. सोंटू आणि त्याच्या कुटुंबीयांकडून आतापर्यंत रोख रक्कम आणि सोने-चांदीसह ३१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्याच्या नागपुरातील लॉकर्समधूनदेखील घबाड सापडले होते. दरम्यान, गोंदियातील नवीन नावाच्या तरुणाला सोंटूच्या तावडीत अडकून आपला जीव गमवावा लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीनने अल्पावधीतच सोंटू्च्या जाळ्यात फसून मोठी रक्कम गमावली होती. त्याच्या या कृत्यामुळे घरातील लोकही रस्त्यावर आले. नंतर नवीनला सोंटूने फसवल्याचे समजले. त्याने सोंटूकडून पैसे परत मिळविण्याचा प्रयत्न केला. सोंटूने त्याला धमकावले आणि ‘माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही’ असे म्हणत खडसावले. यानंतर नवीन तणावात गेला होता व त्याने आत्महत्या केली. नवीनने सुसाइड नोटही लिहून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. सोंटूच्या मोबाइलमध्ये फसवणूक झाल्याचे भक्कम पुरावे होते. हे प्रकरण गोंदिया पोलिसांपर्यंत पोहोचले.

गोंदिया पोलिसांमध्ये चांगलीच ओळख असल्यामुळे नवीनच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती सोंटूला मिळाली. नवीनच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन त्याने एक कोटी रुपये खर्च केले. त्याने नवीनचा मोबाइलही मिळवला व त्यातील सर्व डेटा उडवला. कुटुंबातील सदस्यांचे मौन आणि पुरावे नष्ट केल्यामुळे प्रकरण रखडले. नागपूर पोलिसांच्या तपासात हे सत्य समोर आले. सोंटूची नवी माहिती समोर आल्याने शहर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. पोलिस सोंटू आणि इतर बुकींचे सॉफ्टवेअर बनवणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीDeathमृत्यूnagpurनागपूरgondiya-acगोंदिया