शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

डाक विभागाचा अनाथ बालकांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 8:51 PM

अनाथाश्रमातील मुलांना आधारशी जोडता यावे म्हणून एक अभियान डाक विभागाने राबविले आहे. याअंतर्गत पहिला कॅम्प श्रद्धानंद पेठ येथील अनाथाश्रमात राबविण्यात आला.

ठळक मुद्देश्रद्धानंद अनाथाश्रमात पहिला कॅम्प : कर्मचारी झाले मुलांचे पालक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाची स्वतंत्र एक ओळख असायला हवी, याकरिता प्रत्येक बालकाला आधारशी जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र अनाथाश्रमातील मुलांना आधारशी जोडण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. विशेषत: त्यांची जन्मनोंद आणि पालकांबाबत अनेक समस्या येतात. हे अडथळे दूर करून त्यांनाही आधार लिंक करण्यासाठी डाक विभागाने पुढाकार घेतला आहे. या मुलांना सहज आधारशी जोडता यावे म्हणून एक अभियान डाक विभागाने राबविले आहे. याअंतर्गत पहिला कॅम्प श्रद्धानंद पेठ येथील अनाथाश्रमात राबविण्यात आला.आधार कार्ड ही आज प्रत्येक नागरिकाची गरज झाली आहे. शासनाच्या कोणत्याही योजना, बँकेचे व्यवहार असो किंवा मोबाईलचे सीमकार्ड घेण्याचा प्रकार, प्रत्येक गोष्ट आधार लिंकशिवाय अपूर्ण आहे. अनाथाश्रमातील मुलांसमोर मात्र आधार लिंकच्या अनेक अडचणी आहेत. एकतर त्यांच्या जन्माच्या नोंदणीची अडचण आहे आणि दुसरीकडे पालक म्हणून कुणाचे नाव नोंदवायचे हाही मोठा प्रश्न आहे. ही अडचण दूर करण्यासाठी डाक विभागाने अनाथाश्रमात आधार नोंदणीचे अभियान राबविले आहे. प्रत्येक बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा अधिकार असून, बालकांना त्यांची विशिष्ट ओळख असल्यास रस्त्यावर आढळून येणाऱ्या बालकांसोबतच विविध बालगृहांमधील बालकांचे संगोपन, निरीक्षण, नियंत्रण सोयीस्कर होण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे राज्यभरातील अनाथ बालकांसह विविध कारणांनी बालगृहात दाखल झालेल्या मुलांचे आधार तयार करून त्यांना रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न आहे. यासंदर्भात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे (यूआयडीएआय) आयोगाने प्रस्ताव सादर केल्यानंतर डाक विभागाने अनाथाश्रमातच आधार नोंदणी माहिती चालविली आहे. जन्मतारखेची अडचण सोडविण्यासाठी अनाथाश्रमातील पोलीस रेकार्डनुसार असलेली जन्मतारखेची नोंद ग्राह्य धरत संबंधित अनाथालयाचा पत्ता बालकांच्या आधार कार्डवर टाकला जात आहे. अनाथाश्रमाचे संचालक आणि नियमित कर्मचाऱ्यांना या बालकांचे पालक म्हणून ग्राह्य धरले जात आहे. त्यानुसार राबविलेल्या शिबिरात अनाथाश्रमाच्या ११० मुलांचे नवीन आधार कार्ड काढण्यात आले. श्रद्धानंद अनाथालयाच्या संचालिका डॉ. निशा बुटी, ललिता गावंडे, उज्ज्वला बांगर, प्रतिमा दिवाणजी, रेखा वाघमारे आदींचे पालक म्हणून नाव नोंदविण्यात आले. मुलांचे भारतीय डाक विभागाच्या आयपीपीबीबीचे नवीन अकाऊंट काढण्याचे काम करण्यात आले.यावेळी सिनिअर पोस्टमास्टर जयेश जोशी व मार्केटिंग ऑफिसर धनंजय राऊत, निनीश कुमार, संजीव कुमार, निवृत्ती केंद्रे, संजय साठे, अजय शेंडे, सांची रामटेके आदींचा सहभाग होता. बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विविध कायदे अस्तित्वात असले, तरी विविध कायद्यांमुळेही या प्रक्रियेत अडचणी येतात. त्यासोबतच मतिमंद मुले, अनाथ मुले, बालकामगार यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. कागदपत्रांअभावी अनेक योजनांपासून निराधार बालके वंचित राहतात. अनाथालयातील बालकांबरोबरच रस्त्यावरील भिक मागणाऱ्या बालकांचीही आधार नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील विविध घटकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याची गरज आहे. अशा संस्थांनी सामाजिक भावनेतून बालहक्क जोपासण्यासाठी काम करण्याचे आवाहन धनंजय राऊत यांनी केले.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसAdhar Cardआधार कार्ड