शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

आधार क्रमांक ‘लिंकिंग’चा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 1:23 AM

शासनाने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना राष्टÑीयीकृत बँकांमध्ये बचत खाते उघडायला लावले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २०० रुपये वसूल : नांदच्या जिल्हा परिषद विद्यालयातील प्रकार

राम वघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांद : शासनाने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना राष्टÑीयीकृत बँकांमध्ये बचत खाते उघडायला लावले. नियमानुसार विद्यार्थ्यांच्या बँक खाते क्रमांकाला त्यांचा आधार क्रमांक ‘लिंक’ करावयाचा होता. त्यासाठी नांद (ता. भिवापूर) येथील जिल्हा परिषद विद्यालयात एका खासगी संस्थेला पाचारण करण्यात आले होते. या संस्थेच्या सदस्यांनी आधार क्रमांक ‘लिंंक’ करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून २०० रुपये वसूल केले.शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात असून, त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. यार्पकी एका योजनेंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती बँक खात्यात जमा केली जात असल्याने विद्यार्थ्यांनी पदरमोड करून राष्टÑीयीकृत बँकेत आपापली बचत खाती उघडून खाती क्रमांक शाळेत सादर केली.नांद येथील जिल्हा परिषद विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिकणाºया एकूण ५१३ विद्यार्थ्यांपैकी २०५ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्या विद्यार्थ्यांच्या बँक खाते क्रमांकांना ‘लिंक’ करण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाच्यावतीने या शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने एका खासगी संस्थेला शाळेतच पाचारण करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांना पैसे द्यावे लागतील की नाही, द्यायचे झाल्यास किती रुपये द्यावे लागतील, याबाबत कुणीही कुणालाच कोणत्याही सूचना दिल्या नव्हत्या.दुसरीकडे आधार क्रमांक ‘लिंक’ करण्यासाठी प्रत्येकी २०० रुपयांची मागणी केली जात असल्याने पालकांमध्ये चर्चेचा विषय बनला. या संदर्भात मुख्याध्यापक प्रकाश धोटे यांना विचारणा केली असता, पैसे देण्याबाबत आपण कुणालाही सूचना केली नसल्याचे त्यांनी सांगितले. आधार क्रमारंक ‘लिंक’ करण्यासाठी उमरेडहून आॅपरेटर बोलावण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येकी २०० रुपयांची मागणी करून सदर काम सुरू केले, अशी माहिती आपल्याला मिळाली, असेही प्रकाश धोटे यांनी स्पष्ट केले.५५ विद्यार्थ्यांनी दिले पैसेनांद येथील जिल्हा परिषद विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत यावर्षी एकूण ५१३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या एकूण १५० आणि इयत्ता अकरावी व बारावीच्या एकूण ५५ विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यांना त्यांचे आधार क्रमांक ‘लिंक’ करावयाचे होते. तशा सूचना समाजकल्याण विभागातर्फे मुख्याध्यापकांना ‘व्हॉटसअ‍ॅप’वर देण्यात आल्या होत्या. आधार क्रमांक ‘लिंक’ करण्यासाठी संबंधित संस्थेच्या कर्मचाºयांनी यातील ५५ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २०० रुपये वसूल केले.महा-ई केंद्राचा उपयोग काय?नांद हे परिसरातील मोठे गाव असून, येथे शासनाचे महा-ई केंद्र देखील आहे. या केंद्रात नागरिकांना त्यांचे आधार क्रमांक ‘लिंक’ करण्याची कामे केली जातात. त्यासठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ३० रुपये घेतले जात असून, पैसे मिळाल्याची पावतीही संबंधिताला दिली जाते. या केंद्राबाबत सर्वांनाच माहिती आहे. मग, विद्यार्थ्यांना आधार क्रमांक ‘लिंक’ करण्यासाठी या केंद्रात पाठविण्याऐवजी खासगी संस्थेला शाळेत का पाचारण करण्यात आले, ते कुणाच्या आदेशान्वये करण्यात आले, या संपूर्ण प्रकाराची निरपेक्ष चौकशी करणे, दोषींवर कारवाई करणे तसेच विद्यार्थ्यांचे प्रत्येकी २०० रुपये त्यांना परत करणे गरजेचे आहे.आॅपरेटरने काढला पळया संदर्भात शाळा व्यवस्थापन समिती व सदर प्रतिनिधीने विचारणा केल्यानंतर मुख्याध्यापक प्रकाश धोटे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे, आॅपरेटरने त्यांच्या साहित्याची आवराआवर करून शाळेतून काढता पाय घेतला. त्यामुळे या शाळेतील ५५ विद्यार्थ्यांनी आॅपरेटरला दिलेल्या प्रत्येकी २०० रुपयांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यातच या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणार असल्याची माहिती बीडीओ भुजंग गजभिये यांनी फोनवर दिली. आपण कुणालाही विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्यांना ‘लिंक’ करण्याचे आदेश दिले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.