लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले गेले आहे. अनेकांचे आर्थिक मिळकतीचे स्रोतच बंद झाले आहेत. अशा स्थितीत वीज बिल भरणे शक्य नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या शासनाने राज्यातील वीज ग्राहकांचे २०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात ३ जून रोजी आंदोलनाची भूमिका घेण्यात आली असली तरी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून हे आंदोलन त्यानंतरही चालविण्यावर भर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दिल्ली सरकार मागील दोन वर्षांपासून २०० युनिटपर्यंत वीज मोफत देत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. अशा स्थितीत वीज बिल भरणे नागरिकांसाठी शक्य नाही. महाविकास आघाडीच्या शासनाने जनतेचा विचार करून २०० युनिटपर्यंतची वीज बिले माफ केली पाहिजे. कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांच्या लोकडाऊन काळातील विजेची बिले माफ झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी भूमिका ‘आप’ने मांडली आहे. ही मागणी लावून धरण्यासाठी ‘आप’तर्फे बुधवारी राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे निवेदन तर देण्यात येणारच आहे. शिवाय ‘सोशल मीडिया’तील विविध माध्यमांतून हे आंदोलन चालविण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ मीडिया संयोजक भूषण ढाकूलकर यांनी दिली.
सोशल मीडियातून ‘आप’चे आंदोलन : २०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 8:29 PM
कोरोनामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले गेले आहे. अनेकांचे आर्थिक मिळकतीचे स्रोतच बंद झाले आहेत. अशा स्थितीत वीज बिल भरणे शक्य नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या शासनाने राज्यातील वीज ग्राहकांचे २०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली आहे.
ठळक मुद्देवीज बिलाविरोधात भूमिका