नागपूर : नाईक तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले आहे. या तलावात गेल्या महिन्यापासून एक मोठा कास असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले होते. त्याला बाहेर काढण्यासाठी महिन्याभरापासून प्रयत्न सुरू होता. अखेर रविवारी कासवाला बाहेर काढण्यात यश आले.
हा कासव १२० किलोचा असून, त्याला सेमिनरी हिल्स येथील ट्राझिट सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. स्थानिक लोकांची मागणी आहे की तलावाच्या सौंदर्यीकरणानंतर या कासवाला नाईक तलावातच सोडावे.