नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक घडामोडींचा परिणाम देशांतर्गत नागपुरातील स्थानिक सराफा बाजारात दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात दहा ग्रॅम शुद्ध (२४ कॅरेट) सोने २,३०० रुपयांनी वाढून ३ टक्के जीएसटीएस ७३,४३९ आणि प्रति किलो चांदी ६,१०० रुपयांनी वाढून ३ टक्के जीएसटीसह ८४,४६० रुपयांवर पोहोचली.
बहुतांशवेळी दागिन्यांसाठी वापरण्यात येणारे २२ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह ६८,२८९ रुपयांवर पोहोचले आहेत. दागिन्यांवर मेकिंग चार्ज वेगळा आकारला जातो, हे विशेष. दरवाढीमुळे दागिने खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. मार्च महिन्यात सोन्याचे दर जीएसटीविना ५,३०० रुपये तर एप्रिल महिन्यात आठ दिवसातच २,३०० रुपयांनी वाढले आहेत. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना एप्रिल महिन्यातही फायदा होत आहे. ९ एप्रिलला साजरा होणाऱ्या गुढीपाडव्याला सोन्याचे दर काय राहतील, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
असे वाढले सोने-चांदीचे दर :दिनांक सोने चांदी१ एप्रिल ६९,००० ७५,९००२ एप्रिल ६९,२०० ७६,७००३ एप्रिल ६९,८०० ७८,७००४ एप्रिल ७०,३०० ७९,८००५ एप्रिल ७०,३०० ८०,३००६ एप्रिल ७१,००० ८१,३००८ एप्रिल ७१,३०० ८२,०००(३ टक्के जीएसटीविना वेगळा)