शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

अपहरण झालेला अधिकारी अडकला होता ‘हनी ट्रॅप’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 9:46 PM

औषध कंपनीच्या अधिकाऱ्याला हनी ट्रॅप द्वारे लुटण्यात आले होते. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासह तीन आरोपींना अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : औषध कंपनीच्या अधिकाऱ्याला हनी ट्रॅप द्वारे लुटण्यात आले होते. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासह तीन आरोपींना अटक केली. सूत्रधार व त्याची मैत्रीण फरार आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव सुमित ऊर्फ दद्दू व्यंकटराव परिहार (२१) रा. वैशालीनगर, गन्नू वाटेश्वर मंडळ (२२) वैशालीनगर तसेच तुषार ऊर्फ मोनू ऊर्फ तोत्या अशोक जगताप (१९) रा. अमरनगर आहे. तसेच आरोपी रजत ऊर्फ छोटू ठाकूर व त्याची प्रिया नावाची प्रेमिका फरार आहे.२१ ऑगस्टच्या दुपारी औषध कंपनीच्या अधिकाऱ्याचे अपहरण करून ८ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यामुळे लुटपाट करून चार तासानंतर त्याला सोडून देण्यात आले. परंतु यामागचे काहीतरी दुसरे कारण आहे, असा संशय पोलिसांना होता. पोलिसांना संजयच्या मित्राकडून पैसे घेण्यासाठी आलेल्या युवतीची सीसीटीव्हीद्वारे माहिती मिळाली. त्याच आधारावर पोलिसांनी पुढचा तपास करायला घेतला. पोलिसांनी संजयला विश्वासात घेऊन चौकशी केली असता प्रकरण समोर आले. सूत्रांच्या सांगण्यानुसार प्रिया व तिचा प्रेमी रजत ठाकूर हनी ट्रॅप रॅकेटचा सूत्रधार आहे. प्रिया तुमसर येथील आहे. ती किरायाने राहते. ती संपन्न व्यक्तीसोबत मैत्री करायची. त्याला रूममध्ये बोलावून रजत व अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने धमकावून लुटपाट करायची. सोनेगाव ठाण्यात त्यांच्याविरुद्ध हप्तावसुलीचा गुन्हाही दाखल आहे. पीडित तक्रार दाखल करीत नसल्यामुळे ते पोलिसांच्या जाळ्यात सापडत नव्हते.या प्रकरणात प्रियाने संजयला सुमित परिहार याच्या फ्लॅटवर बोलाविले. सुमित इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. त्याने अभ्यासासाठी फ्लॅट भाड्याने घेतला आहे. संजय तिथे पोहचल्यानंतर रजत ठाकूर अन्य साथीदारासोबत तिथे आला. तो प्रियाला बहीण असल्याचे भासवून संजयला धमकावू लागला. त्याचे जबरदस्तीने प्रियासोबत फोटोही काढले. बदनामी करण्याची धमकी देऊन मारपीट करू लागला. भयभीत होऊन संजयने त्याला पैसेही दिले. सत्य परिस्थिती लक्षात आल्यावर पोलिसांनी सुमित परिहारच्या फ्लॅटवर छापा मारून त्याला अटक केली. त्याचबरोबर इतर दोघांनाही ताब्यात घेतले. प्रिया रजतसोबत फरार झाल्याचा संशय आहे. ही कारवाई डीसीपी विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हेमंत खराबे, एपीआय रमेश हत्तीगोटे, पीएसआय विजय नेमाडे, अरविंद मोहोड, हवालदार विनायक मुडे, आशिष दुबे तसेच प्रिया हिरवानी यांनी केली.

टॅग्स :honeytrapहनीट्रॅपMIDCएमआयडीसीArrestअटक