शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
5
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
6
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
8
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
9
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
10
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
11
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
12
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
13
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
14
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
15
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

नागपुरात भूलथापा देऊन अल्पवयीन मुलीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 9:27 PM

बालाघाटमधील एका युवकाने प्रेमसंबंधातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. ही घटना लकडगंज ठाण्यांतर्गत घडली.

ठळक मुद्दे कामगाराचे कृत्य : लकडगंज ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : बालाघाटमधील एका युवकाने प्रेमसंबंधातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. ही घटना लकडगंज ठाण्यांतर्गत घडली.अंकित गेडाम (२३) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी १७ वर्षांची असून बारावीची विद्यार्थिनी आहे. आरोपी विद्यार्थिनीच्या घरासमोर सुरू असलेल्या बांधकामावर काम करीत होता. तेव्हापासून त्याची तिच्यावर नजर होती. विद्यार्थिनी गरीब कुटुंबातील आहे. तो १९ ऑगस्टला तिला घेऊन पळून गेला. मुलगी घरी नसल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यांना अंकितसोबत तिची ओळख असल्याची माहिती नव्हती. अंकितही कामावरून गायब झाल्यामुळे कंत्राटदाराला शंका आली. त्याने माहिती घेतली असता अंकित मानकापूरमध्ये काम करीत असल्याची माहिती मिळाली. विद्यार्थिनीचे आई-वडील त्वरित मानकापूरला पोहोचले. तिचे आईवडील येणार आहेत हा धोका ओळखता अंकित फरार झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी लकडगंज ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसाच्या आत लकडगंज ठाण्यातील हा दुसरा गुन्हा आहे. १७ ऑगस्टलाही एका दहावीच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. ऑनलाईन अभ्यास असल्यामुळे ती मोबाईलवर व्यस्त राहत होती. कामाच्या निमित्ताने घराबाहेर गेल्यानंतर तिचा काही शोध लागला नाही. पोलिसांनी माहिती घेतली असता ती कारमधून गेल्याचे समजले. दोन दिवसात या घटना घडल्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत. कामात व्यस्त असल्यामुळे आईवडिलांनाही मुले काय करतात, याची माहिती होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना शोधणे कठीण होते.

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी