शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

अभय घुसे यांनी घडविला ‘ब्रह्मांड नायक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 1:45 AM

अभय घुसे. शिक्षण-केवळ नववी. मूर्ती सजावटीचे कुठलेही तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले नाही. परंतु त्यांनी घडविलेल्या मूर्ती इतक्या कल्पक आहेत की बॉलिवूडचे अनेक नामांकित तारे त्यांच्या कलेच्या प्रेमात पडले आहेत.

ठळक मुद्देमूर्ती सजावटीत प्राविण्य : अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, राजबब्बर यांनी केले कलेचे कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभय घुसे. शिक्षण-केवळ नववी. मूर्ती सजावटीचे कुठलेही तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले नाही. परंतु त्यांनी घडविलेल्या मूर्ती इतक्या कल्पक आहेत की बॉलिवूडचे अनेक नामांकित तारे त्यांच्या कलेच्या प्रेमात पडले आहेत. अशा या प्रतिभावंत कलाकाराने यंदाच्या गणेशोत्सवात ‘ब्रह्मांड नायक’ साकारला असून १११ शुभ्र रत्नांची ही कलाकृती सध्या शहरात चर्चेचा विषय बनली आहे. अभय घुसे हे कोराडी नाक्यावर राहतात. कलेच्या या क्षेत्राकडे वळण्याआधी ते एका ज्वेलर्सकडे काम करायचे. तेथील सोन्याच्या दागिन्यांची नक्षी त्यांना कायम खुणावत असायची. ही नक्षी डोक्यात साठवून त्यांनी एक दिवस घरीच ताब्यांच्या दागिन्यांना आकार दिला. त्यांच्या कल्पकतेला दाद मिळू लागली. एका कुटुंबाने त्यांना साईबाबांचे मुकुट बनवायला सांगितले. ते इतके अप्रतिम झाले की त्यांना अशी डिझाईनची कामे सातत्याने मिळू लागली. त्यांच्या कल्पकतेची वार्ता लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी अभय घुसे यांच्याकडून खास अमिताभ बच्चन यांच्यासाठी गणेशाची मूर्ती सजवून घेतली व यवतमाळ येथे झालेल्या लोकमत युवा मंचच्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात ती अभय घुसे यांच्या उपस्थितीतच अमिताभ बच्चन यांना भेट दिली. ही घटना घुसे यांच्यासाठी टर्निंग पॉर्इंट ठरली.घुसे यांना कलेच्या क्षेत्रात विशेष ओळख लाभली आणि पुढे हेमामालिनी यांनी त्यांच्याकडून खास साईबाबांची मूर्ती बनवून घेतली. राजबब्बर यांनीही साईबाबाच्या मूर्तीची आॅर्डर दिली. सनी देओलने एक खास ट्रॉफी घडवून घेतली. विजय दर्डा यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक मधूर भांडारकर यांना भेट देण्यासाठी घुसे यांच्याकडून खास राधाकृष्णची मूर्ती बनवून घेतली. मूर्तिकलेच्या क्षेत्रातील या १५ वर्षांच्या प्रवासात घुसे यांनी असे अनेक कॉर्पोरेट गिफ्ट तयार केले आहेत ज्यांना देशभरात मोठी मागणी लाभली आहे.याचे श्रेय लोकमतलाचमाझी आज जी ओळख आहे त्याचे संपूर्ण श्रेय लोकमत व विजय दर्डा यांनाच आहे. त्यांनीच माझ्यातील कलाकाराला प्रोत्साहन दिले. लोकमतबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी साकारलेला ‘ब्रह्मांड नायक’ लवकरच मी विजय दर्डा यांना भेटस्वरूप देणार आहे. या मूर्तीत लाकडापासून बनवलेले स्वर्णमुद्रेचे सिंहासन आहे. सोबतच अमिताभ यांच्या आवाजातील गणेशाची आरतीही यात ऐकता येते.