शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

लाचेची रक्कम घेऊन पळालेला पोलीस बेपत्ताच

By admin | Published: February 19, 2017 2:28 AM

एसीबीच्या सापळ्यात अडकल्याचे ध्यानात येताच लाचेची रक्कम घेऊन पसार झालेला हुडकेश्वर ठाण्यातील

अटकेतील आरोपींचा पीसीआर : एसीबीसोबत पोलिसांचीही शोधाशोध नागपूर : एसीबीच्या सापळ्यात अडकल्याचे ध्यानात येताच लाचेची रक्कम घेऊन पसार झालेला हुडकेश्वर ठाण्यातील पोलीस हवालदार गुरुदेव संतोषराव कुंभलकर २४ तासांपेक्षा जास्त कालवधी होऊनही पोलिसांना सापडला नाही. दरम्यान, या प्रकरणात एसीबीने शुक्रवारी दुपारी जेरबंद केलेल्या नायक पोलीस शिपाई संजय मारोतराव बांगडकर (वय ४५) आणि पोलीस शिपाई शोएब हबीब शेख (वय ३२) या लाचखोरांना कोर्टात हजर करून त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळवली. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय बांगडकर हा हुडकेश्वर ठाण्यातील डीबी (गुन्हे प्रकटीकरण) पथकात आहे. या पथकाने पकडलेल्या एका चोरट्याने आपण चोरीचे सोने पारडीतील सराफा व्यावसायिकाला विकल्याचे चौकशीदरम्यान सांगितले. तेव्हापासून बांगडकरने सराफा व्यावसायिकाला चोरीचे सोने घेण्याच्या आरोपात अटक करण्याची भीती दाखवणे सुरू केले. कारवाई टाळायची असेल तर पाच हजारांची लाच द्यावी लागेल, असे बांगडकर म्हणाला. लाच मिळावी म्हणून त्याने सराफा व्यावसायिकाला त्रस्त केल्यामुळे सराफा व्यावसायिकाने ४ फेब्रुवारीला बांगडकर याने लाच मागितल्याची एसीबीकडे तक्रार नोंदवली. शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार, सराफा व्यावसायिकाने लाचेची रक्कम देण्यासाठी शुक्रवारी दुपारी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात बांगडकरची भेट घेतली. मात्र, त्याने ही रक्कम पोलीस शिपाई शोएब हबीबकडे देण्यास सांगितले. शोएबने तिसऱ्या व्यक्तीकडे तर, तिसऱ्या व्यक्तीने कुंभलकरकडे रक्कम देण्याचा इशारा केला. कुंभलकरने रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने शोएब आणि बांगडकरच्या मुसक्या बांधल्या. ते पाहून लाचेची रक्कम स्वीकारणारा हवालदार कुंभलकर ठाण्यातून पळून गेला. एसीबीच्या पथकाने कुंभलकरच्या घरी आणि नातेवाईकांकडे शोधाशोध चालवली आहे. मात्र, २४ तासांपेक्षा जास्त अवधी होऊनही तो सापडला नाही. दरम्यान, एसीबीने अटक केलेल्या बांगडकर आणि शोएबला शनिवारी दुपारी कोर्टात हजर करून त्याचा २ दिवसांची कोठडी मिळवली. फरार कुंभलकरचा एसीबीचे पथक तसेच पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)