नागपूर : ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संविधान चौकात उपोषण आंदोलन सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात आंदोलन स्थळी येत ओबीसी शिष्टमंडळाला चर्चेला बोलाविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सरकारने रविवारपर्यंत चर्चेला बोलाविले नाही तर सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.
तायवाडे यांनी राज्यातील ओबीसी मतदार सर्वाधिक आहेत. ओबीसींच्या मतांवर निवडून येणाऱ्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे ओबीसींची मागणी लावून धरावी, असे आवाहन यावेळी केले. आंदोलनाला शरद वानखेडे, सुरेश कोंगे, नरेश बरडे, भुषण दडवे, डॉ. राजेश ठाकरे, डॉ मनोहर तांबुलकर, प्रा. रमेश पिसे, नागपूर कामठी परदेशी धोबी समाजाचे नरेश बैस्वारे, कुणबी सेवासंघाचे पंकज पांडे, कुणबी महासंघाचे अध्यक्ष राजु भोतमांगे, कार्याध्यक्ष राजु खडसे, श्रीकांत मसमारे, घनश्याम मांगे, गेमराज गोमासे, हेमंत गावंडे, गणेश नाखले, अनंता भारसाकळे, ॲड. प्रकाश भोयर, सुशिल ठाकरे, नाना सातपुते, शकील पटेल, प्रा. संजय चौधरी आदींनी भेट देत पाठिंबा दिला.
गुरुवारी यांनी केले उपोषण
- गुरुवारीही उपोषण आंदोलन सुरू राहिले. डॉ मनोहर तांबुलकर, डॉ. कीरण नेरकर, भूषण दडवे, बंडू कापसे, गजानन काकडे, माधवराव गावंडे, नरेंद्र लीलारे, महेंद्र उईके, भास्कर भोयर, अरुण साखरकर, डॉ. रत्नाकर लांजेवार, भास्कर भनारे, राकेश ईखार, कल्पना मानकर, राजु खडसे, रविंद्र आदमने, युवराज कामडे, प्रतिमा उईके आदींनी उपोषण केले.