देवेंद्र फडणवीस : भगवानदास पुरोहित सभागृहाचे उद्घाटननागपूर : राज्य सरकारकडून शिक्षण संस्थांना अनुदान दिले जाते. परंतु शिक्षण संस्था शिक्षकांसाठी चालविल्या जातात की विद्यार्थ्यांसाठी, असा प्रश्न पडतो. शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांचे हित जपले तरच शिक्षण क्षेत्रात परिवर्तन होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. भारतीय विद्या भवनच्या सिव्हिल लाईन येथील शाळेच्या भगवानदास पुरोहित सभागृह व संस्थेच्यावतीने आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, भारतीय विद्या भवन ट्रस्टचे विश्वस्त व नागपूर केंद्राचे अध्यक्ष बनवारीलाल पुरोहित यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते.भारतीय संस्कृती जगात सर्वात प्राचीन व श्रेष्ठ आहे. सहिष्णुतेमुळे आपल्या देशातील संस्कृती आजही जिवंत आहे. अज्ञानातून संघर्ष निर्माण होतो. ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करणे हा ज्ञानाचा भाव आहे. विश्व हे आपले कुटुंब आहे. जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती जिवंत राहावी. दुसऱ्यांच्या संस्कृतीचाही सन्मान करण्यची भावना असली तर समाजात सामंजस्य निर्माण होते. स्वामी विवेकानंदांची हीच शिकवण होती. समाजाला आजही त्यांच्या विचाराची गरज असल्याचे फ डणवीस म्हणाले. भारत युवा राष्ट्र आहे. २०२० सालात भारत हा जगाचे नेतृत्व करेल. यात शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विचारानेच नाही तर हृदयानेही एकत्र आलेले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राचा विकास क ोणीही रोखू शकत नाही. भारतीय विद्या भवन विद्यार्जनासोबतच भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्याचे काम करीत आहे. संस्थेच्या देशभरात ४०१ शाखा असून यात २ लाख २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती बनवारीलाल पुरोहित यांनी दिली. व्यासपीठावर एच.एन. दस्तूर, रूपा कुलक र्णी, सुनंदा सोनारीकर, के . एम. अग्रवाल, सी.जी. राघवन, क्यू.एच. जीवाजी, राजेंद्र पुरोहित, ए.के. मुखर्जी, राकेश पुरोहित, टी.जी.एल. अय्यर, राजेंद्र चांडक, विनय नांगिया, जिम्मी राणा, पद्मिनी जोग यांच्यासह पदाधिकारी व प्राचार्य उपस्थित होते. प्राचार्य अन्नपूर्णा शास्त्री यांनी आभार व्यक्त केले. (प्रतिनिधी)स्नेहांचल संस्थेला १० लाखांची मदतसामाजिक जाणिवेतून विद्या भवनच्या विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्यातून गोळा केलेल्या १०,२८,४०० रुपयाच्या रकमेचा धनादेश देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॅन्सर रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मदत करणाऱ्या स्नेहांचल संस्थेचे जिम्मी राणा यांना सुपूर्द करण्यात आला.
विद्यार्थी हितातूनच शैक्षणिक परिवर्तन
By admin | Published: May 24, 2016 2:34 AM