लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लोकहितासाठी होत असलेल्या कामांना गती देण्यासाठी प्रयत्न करावे. जर त्यात काही अडचण आली तर थेट मला संपर्क करा, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले. रविभवन येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान त्या बोलत होत्या.
यादरम्यान त्यांनी शिवसंपर्क मोहिमेचा आढावा घेतला तसेच संजय गांधी निराधार योजना समितीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. त्यांनी संघटन विस्तारावर भर देत जनतेची कामे जास्तीत जास्त व्हायला हवी. तसेच कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांचा थेट लाभ कामगारांनाच पोहोचयला हवा, असे निर्देश दिले. यावेळी शहर प्रमुख नितीन तिवारी व दीपक कापसे यांनी शिवसंपर्क मोहिमेंतर्गत होणाऱ्या कामांवर प्रकाश टाकला. खा. कृपाल तुमाने, आ. आशिष जयस्वाल, आ. दुष्यंत चतुर्वेदी, मनीषा कायंदे, संपर्क प्रमुख संजय सूर्यवंशी, जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे, राजू हरणे, संदीप इटकेलवार, नगरसेविका मंगला गवरे, सुरेश साखरे, हितेश यादव, शुभम नवले, अलका दलाल, नाना झोडे प्रामुख्याने उपस्थित होते.