लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला अंतिम मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले करण्याच्या दिशेने सरकारचे प्रयत्न असून, येथील कामांना गती देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी शनिवारी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाची पाहणी केली.नुकतीच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण बैठकीत गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला अंतिम मान्यता मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर संग्रहालयातील विकास कामांची पाहणी वन राज्यमंत्र्यांनी केली. प्राणिसंग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात असून, काही कामे अपूर्ण असून ती लवकर पूर्ण करण्याचे निर्देश फुके यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत वन सचिव विकास खारगे उपस्थित होते.गोरेवाडा प्राणिसंगहालय देशातील मोठे प्राणिसंग्रहालय असेल असे सांगून राज्यमंत्री परिणय फुके म्हणाले की, एकूण १९१४ हेक्टर क्षेत्र असलेल्या या प्रकल्पात ५३९ हेक्टरवर चार प्रकारच्या सफारी होतील. पर्यटकांसाठी हे प्राणिसंग्रहालय आकर्षण असणार आहे. यात जैवउद्यानासह भारतीय सफारी, आफ्रिकन सफारी, रात्र सफारीच्या सोयी पर्यटकांना उपलब्ध होतील.वन परिक्षेत्र अधिकारी संघटनेकडून मुख्यमंत्री साहाय्यता निधीला ५० हजारांची मदतकोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी वन परिक्षेत्र अधिकारी संघटनेकडून ५० हजारांचा धनाकर्ष मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी राज्यमंत्री परिणय फुके यांना देण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष के. व्ही. बोलके, एन. आर. गावंडे, एन. एस. भोगे, पी. पखाले उपस्थित होते.
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील कामांना गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 8:26 PM
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला अंतिम मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार येथील कामांना गती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संग्रहालयातील विकास कामांची पाहणी वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी केली.
ठळक मुद्देराज्यमंत्री परिणय फुके यांनी केली पाहणी