शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
3
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
4
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
5
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
6
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
7
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
8
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
9
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
10
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
11
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
12
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
13
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
14
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
15
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
16
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
17
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
18
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
19
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
20
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य

जिल्ह्यात अपघातवार

By admin | Published: February 21, 2017 2:14 AM

जिल्ह्यातील कन्हान, देवलापार, उमरेड, कळमेश्वर व हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघाताच्या चार वेगवेगळ्या घटना घडल्या.

चौघांचा मृत्यू : वेगवेगळ्या पाच घटनांमध्ये ११ जण जखमीनागपूर : जिल्ह्यातील कन्हान, देवलापार, उमरेड, कळमेश्वर व हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघाताच्या चार वेगवेगळ्या घटना घडल्या. त्यात चौघांचा मृत्यू झाला असून, ११ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये सहा वर्षीय बालकासह एका तरुणाचा व कामगाराचा समावेश आहे. या घटना कन्हान शहर, वडांबा शिवार, कळमेश्वर बायपास रोड व उदासा - ठोंबरा मार्गावर घडल्या. कन्हान येथील जखमींना कामठी येथे तर उर्वरित दोन अपघातातील जखमींना नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती केले आहे. कन्हान : लग्न समारंभ आटोपून परत जाण्यासाठी उभ्या असलेल्या सहा जणांना भरधाव मोटरसायकलने धडक दिली. त्यात गंभीररीत्या जखमी होऊन बालकाचा मृत्यू झाला. तर उर्वरित पाच जणांसह मोटरसायकल चालक हा गंभीर जखमी झाला. त्यांना लगेच कामठी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. हा अपघात कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयदुर्गा मंगल कार्यालयासमोर रविवारी (दि. १९) रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास झाला.प्रिन्स राजेश यादव (६, रा. यादव नगर, कामठी) असे मृत बालकाचे नाव असून जखमींमध्ये अभिषेक महेश यादव (२३), महेश माधवलाल यादव (५१), शानसिंह सत्यनारायण यादव (५४), रूपलाल यादव (६२), प्रीतम विजय यादव (१२) सर्व रा. यादवनगर कामठी यांच्यासह मोटरसायकल चालक संजय मेहुणे रा. विवेकानंदनगर कन्हान यांचा समावेश आहे. कन्हान नगर परिषद कर्मचारी रामू यादव यांच्याकडील लग्न सोहळा राष्ट्रीय महामार्गावरील जयदुर्गा मंगल कार्यालयात होता. या लग्न समारंभात सहभागी होऊन लग्न आटोपल्यानंतर ते कामठी येथे जाण्याच्या तयारीत होते. मंगल कार्यालयासमोर ते आपल्या वाहनाजवळ उभे असताना एमएच-३१/डीपी-६७११ क्रमांकाच्या भरधाव मोटरसायकलने धडक दिली. त्यात प्रिन्स आणि इतर पाच जण तसेच मोटरसायकल चालक जखमी झाला. त्यांना लगेच कामठीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. तिथे प्रिन्सला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी मोटरसायकल चालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय पोटे करीत आहे. (शहर प्रतिनिधी)