लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सौदी अरेबियातील दम्माम येथे कमर्शियल शीपवर झालेल्या अपघातात नागपुरातील एका युवकाचा मृत्यू झाला. अपघाताला आठ दिवस लोटूनही त्याचा मृतदेह अद्याप कुटुंबीयांना मिळाला नाही. त्यामुळे मुलाच्या पार्थिवासाठी वडिलांनी सौदी अरेबिया व भारत सरकारला साद घातली आहे. मात्र चौकशीच्या नावावर सौदी अरेबियाने पार्थिव परत दिलेले नाही.लव शर्मा असे मृत युवकाचे नाव आहे. राजीव शर्मा त्याचे वडील आहेत. ते क्लार्क टाऊन येथे राहतात. लव हा सौदी अरेबिया येथील दम्मामच्या बहारी ड्राय बल्क कंपनीत मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत होता. या कंपनीने लव शर्माला नियुक्त केले होते. बहारी बल्क या जहाजावर लव शर्मा १८ नोव्हेंबर २०१८ पासून कार्यरत होता. दरम्यान दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी जहाजावरील कार्गो एरियात कंटेनर लोडिंग करीत असताना अपघात झाला. त्यात लव शर्मा याच्यासह दोघेजण गंभीर जखमी झाले. त्या तिघांनाही सौदी अरेबियातील रूग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तिथे त्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेची माहिती नागपुरातील शर्मा कुटुंबीयांना सौदी अरेबियातील कंपनीने दिली. तरुण मुलाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याचे कळताच शर्मा कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. लव हा या कुटुंबाचा थोरला मुलगा आहे. मर्चंट नेव्हीत करिअर करण्याचा त्याने निर्णय घेतला होता. मुंबईतील कंपनीमार्फत त्याला सौदी अरेबियात नोकरी मिळाली होती. त्यामुळे शर्मा कुटुंबीय आनंदात होते. मात्र, अचानक लव शर्मावर काळाने झडप घातली.मुलाच्या मृत्यूने हादरलेल्या शर्मा कुटुंबीयांना मुंबईतील कंपनी लव शर्माचे पार्थिव मुंबईत आणणार असल्याचे कळविले होते. त्यासाठीचा सर्व खर्च व प्रशासकीय प्रक्रिया कंपनीकडून करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. त्यामुळे राजीव शर्मा हे मुंबईत दाखल झाले. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून ते मुंबईत मुलाच्या पार्थिवाची प्रतीक्षा करीत आहे. सौदी अरेबियाच्या सरकारने कार्गो जहाजात झालेल्या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय लव शर्माचे पार्थिव सोपवणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राजीव शर्मा यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याप्रकरणात मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.
सौदी अरेबियात घडला अपघात : मृत मुलाच्या पार्थिवाची कुटुंबीयांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 9:41 PM
सौदी अरेबियातील दम्माम येथे कमर्शियल शीपवर झालेल्या अपघातात नागपुरातील एका युवकाचा मृत्यू झाला. अपघाताला आठ दिवस लोटूनही त्याचा मृतदेह अद्याप कुटुंबीयांना मिळाला नाही. त्यामुळे मुलाच्या पार्थिवासाठी वडिलांनी सौदी अरेबिया व भारत सरकारला साद घातली आहे. मात्र चौकशीच्या नावावर सौदी अरेबियाने पार्थिव परत दिलेले नाही.
ठळक मुद्देवडिलांची सरकारला साद