नरखेड : धावत्या दुचाकीवर माकडाने उडी मारल्याने ताबा सुटून दुचाकीस्वार राेडवर पडला. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरगाव मार्गावर नुकतीच घडली.
रवींद्र पुंडलिक सातपुते (६०, रा. धंताेली, काटाेल) असे मृताचे नाव आहे. रवींद्र सातपुते हे आपल्या दुचाकीने काटाेल येथून मसाेरा गावी जात हाेते. दरम्यान, सावरगावनजीक त्यांच्या दुचाकीवर माकडाने उडी मारल्याने ते दुचाकीसह राेडवर पडले. यात त्यांना गंभीररीत्या दुखापत झाली. लगेच त्यांना प्रथम सावरगाव प्राथमिक आराेग्य केंद्र व त्यानंतर नागपूर येथील मेयाे हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा १७ मार्च राेजी मृत्यू झाला. याप्रकरणी मेयाे पाेलीस बूथच्या सूचनेवरून नरखेड पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस हवालदार धनराज भुक्ते करीत आहेत.