शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

नागपुरात अभियंत्याचा आकस्मिक मृत्यू; ऑनलाईन मागवलेल्या सामिष भोजनाबाबत साशंकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:42 PM

ऑनलाईन चिकन मागवून खाल्ल्यानंतर काही वेळातच एका तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.

ठळक मुद्देपोलिसांचा तपास सुरूउलटसुलट चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑनलाईन चिकन मागवून खाल्ल्यानंतर काही वेळातच एका तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.विराज नरेंद्र ताकसांडे असे मृताचे नाव आहे. विराज सॉफ्टवेअर इंजिनियर होता. त्याची स्वत:ची कंपनी त्याने निर्माण केली होती. त्याचे आई-वडील कुटुंबीय मनीषनगरात राहतात. तर तो त्याची पत्नी पूजा हिच्यासह लक्ष्मीनगरातील आठ रस्ता चौकात असलेल्या अभिनवअपार्टमेंटमध्ये राहायचा.शनिवारी रात्री ८ च्या सुमारास बजाजनगरातील एका हॉटेलमधून विराजने ऑनलाईन शेजवान चिकन मागविले. ९ वाजताच्या सुमारास पती-पत्नीने चिकन राईस आणि नूडल्स खाल्ले. त्यानंतर काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले. तो बाथरूमला गेला आणि परत आला तेव्हा त्याला दरदरून घाम फुटला होता. पत्नीने लगेच त्याच्या मित्रांना फोन करून बोलवून घेतले. मित्र आल्यानंतर विराजसह सर्वजण ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्याची प्रकृती बघून तेथील डॉक्टरांनी बजाजनगर पोलिसांना कळविले आणि विराजला मेडिकलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. पोलिसांच्या समोरच विराजला मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी विराजला तपासून मृत घोषित केले. यावेळी रात्रीचे ११ वाजले होते. विराजच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि डॉक्टरांनी विराजची कोरोना टेस्ट करून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा अहवाल सोमवारी रात्रीपर्यंत पोलिसांना मिळाला नव्हता. सोमवारी अहवाल मिळेल आणि त्यानंतर पुढचे ठरविण्यात येईल, असे ठाणेदार राघवेंद्र क्षीरसागर यांनी लोकमतला सांगितले. दरम्यान विराजचा मृत्यू फूड पॉयझनिंगमुळे झाला की आणखी कशामुळे, त्यासंदर्भात उलटसुलट चर्चा आहे. त्याने मागविलेले ऑनलाईन चिकन आणि राईस पत्नीनेही सोबतच खाल्ले. मात्र तिच्या प्रकृतीवर त्याचा काहीही परिणाम नाही झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू चिकन खाल्ल्यामुळेच झाला की अन्य दुसरे कोणते कारण आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.लठ्ठपणावर सुरू होते उपचारयासंदर्भात  माहिती देताना ठाणेदार क्षीरसागर यांनी सांगितले की, विराज हा लठ्ठ होता. त्याचे वजन १२० किलोपेक्षा जास्त होते. काही महिन्यांपूर्वी त्याच्या मांडी, पोटरीतील रक्त गोठल्यामुळे त्याला त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यावर उपचार सुरू केले होते.

टॅग्स :Deathमृत्यू