शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

शिकवणीला निघालेल्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 1:29 AM

भरधाव बसने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील लहान बहिणीचा करुण अंत झाला. तर, मोठी बहीण गंभीर जखमी झाली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी २ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने बसची तोडफोड करून आरोपी चालकाची बेदम धुलाई केली.

ठळक मुद्देभरधाव बसची धडक : अपघातात मोठी बहीणही जखमी : संतप्त जमावाकडून बसची तोडफोड, तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव बसने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील लहान बहिणीचा करुण अंत झाला. तर, मोठी बहीण गंभीर जखमी झाली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी २ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने बसची तोडफोड करून आरोपी चालकाची बेदम धुलाई केली.नंदनवनमधील जयभीम चौकाजवळच्या हिवरीनगर झोपडपट्टीत राहणारी निकिता पांडुरंगजी खोप (वय २०) तिची लहान बहीण रागिणी (वय १२) हिला आपल्या अ‍ॅक्टिव्हावर बसवून महालकडे जात होती. गंगाबाई घाट चौकाजवळच्या गंगा मार्बल दुकानाजवळ आरोपी बसचालक मनीष सखाराम सोनटक्के (वय २७, रा. वर्धमाननगर) याने त्याच्या ताब्यातील बस (एमएच ४०/ एन ८५९९) निष्काळजीपणे चालवून निकिताच्या दुचाकीला समोरून धडक मारली. त्यामुळे खाली पडून गंभीर जखमी झाल्याने रागिणीचा मृत्यू झाला तर निकिता जबर जखमी झाली.अत्यंत वर्दळीच्या भागात भरदिवसा हा भीषण अपघात झाल्याने संतप्त जमावाने बसचालकाला खाली खेचले. त्याची बेदम धुलाई करून बसवर दगडफेक केली. बसची तोडफोड करतानाच काहींनी बसच्या इंधन टँकला फोडून आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यातच नंदनवन पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. तोपर्यंत तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमाव जुमानत नसल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर करून जमावाच्या ताब्यातून आरोपी बसचालक मनीष सोनटक्केला ताब्यात घेतले. जमावाला पांगविल्यानंतर अपघातग्रस्त वाहने तेथून हटविण्यात आली. त्यानंतर तणाव निवळला.कुटुंबीयांवर जबर मानसिक आघातया अपघाताने खोप कुटुंबीयांवर जबर मानसिक आघात झाला आहे. जखमी निकिताचे वडील पांडुरंग आनंदराव खोप (वय ५३) हे विणकर आहेत. सर्वसाधारण स्थितीतूनही त्यांनी मुलींना शिकवून मोठे अधिकारी बनविण्याचे स्वप्न बघितले होते. मृत रागिणी सहावीत शिकत होती. तिला शिकवणी वर्गाला सोडण्यासाठी निकिता घरून निघाली होती. रागिणीच्या मृत्युमुळे निकितालाही जबर मानसिक धक्का बसला आहे. ती रुग्णालयात दाखल आहे. ती काही बोलण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे समजते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू