लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या कोरोनाबाधित रुग्णांना सातव्या, आठव्या व नवव्या दिवशी ताप नसल्यास, त्या रुग्णांना दहाव्या दिवशी कोरोनाची चाचणी न करता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याच्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार मेडिकलने २१ रुग्णांना तर १४ दिवसानंतर नमुने निगेटिव्ह आलेल्या सात रुग्णांना गुरुवारी सुटी दिली. बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या आता १४० झाली आहे. आज पुन्हा तीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ३१८ झाली आहे. विशेष म्हणजे, दोन रुग्ण नव्या वसाहतीतील आहेत.कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्याच्या जुन्या मार्गदर्शक सूचनेनुसार सौम्य, अति सौम्य व लक्षणे नसलेले कोविड विषाणूचे निदान झालेल्या रुग्णांना रुग्णालयात १४ दिवस ठेवले जात होते. या दरम्यान त्यांच्या पाचव्या किंवा सातव्या दिवशी व १४ व्या दिवशी २४ तासाच्या अंतराने नमुने तपासले जात होते. लक्षणे नसलेतरी नमुने निगेटिव्ह आल्यावरच त्यांना रुग्णालयातून सुटी दिली जात होती. परंतु आता सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार कोविडच्या ज्या रुग्णाला लक्षणे सुरू झाल्यापासून सात ते नऊ दिवसाच्या कालवधीत ताप आलेला नाही त्या रुग्णाला दहाव्या दिवशी तपासणी करून डिस्चार्ज देण्यास सांगितले आहे. रुग्णांना रुग्णालयातून सुटी देताना कोविड विषाणूसाठी प्रयोगशाळा तपासणीची आवश्यकता नसल्याचेही म्हटले आहे. डिस्चार्ज झालेल्या रुग्णांना पुढील १४ दिवसासाठी घरी विलगीकरण कक्षात ठेवण्याचा व त्यांच्या हातावर तसा स्टॅम्प लावण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मेडिकलमधून २१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.सतरंजीपुरा येथील १६ रुग्ण डिस्चार्जनव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सतरंजीपुरा येथील ५, ९ वर्षीय मुलगी, १४, २५,२९, ३५, ४१, ५५, ६०, ६१, ६४ वर्षीय महिला, २५, २७, २८, ३०, ५३, वर्षीय पुरुष, असे १६ रुग्ण तर मोमीनपुरा येथील ६ वर्षीय मुलगी, ३५ वर्षीय महिला व ३३ वर्षीय पुरुष, असे तीन तर शांतिनगर येथील १५वर्षीय मुलगी, यशोदानगर येथील ७ वर्षीय मुलगा यांना डिस्चार्ज देण्यात आला.खरबी व राणीनगरात रुग्णआज नोंद झालेले तीन रुग्णामधून खरबी येथील ६५ वर्षीय व अग्रसेन भवन येथील २० वर्षीय रुग्णाचा नमुना मेडिकलच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला आहे. हे दोन्ही रुग्ण सारीचे आहे. हे दोन्ही मेडिकलमध्ये भरती आहे तर सतरंजीपुरा येथील २८ वर्षीय रुग्णांचे नमुनेही पॉझिटिव्ह आले आहे. हा रुग्ण व्हीएनआयटीमध्ये क्वारंटाईन होता.डिस्चार्ज रुग्णांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलेसुधारित कोविड रुग्णांच्या डिस्चार्ज धोरणानुसार आज २१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. पुढील १४ दिवस त्यांना सक्तीने होम क्वारंटाईन रहायचे आहे. त्यासाठी त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे.-डॉ. सजल मित्राअधिष्ठाता, मेडिकलकोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित १६३दैनिक तपासणी नमुने ५४७दैनिक निगेटिव्ह नमुने ५४४नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ३१८नागपुरातील मृत्यू ०४डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण १४०डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १८५०क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २११४पीडित-३१८दुरुस्त-१४०मृत्यू-४
नागपुरात सुधारीत डिस्चार्ज धोरणानुसार २१ रुग्ण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 11:59 PM
ज्या कोरोनाबाधित रुग्णांना सातव्या, आठव्या व नवव्या दिवशी ताप नसल्यास, त्या रुग्णांना दहाव्या दिवशी कोरोनाची चाचणी न करता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याच्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार मेडिकलने २१ रुग्णांना तर १४ दिवसानंतर नमुने निगेटिव्ह आलेल्या सात रुग्णांना गुरुवारी सुटी दिली.
ठळक मुद्देतीन रुग्ण पॉझिटिव्ह : २८ रुग्ण कोरोनामुक्त