लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणात अकोल्यात अटक करण्यात आल्यानंतर फरार झालेल्या आरोपील नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारंजा घाडगे तालुक्यातील कन्नमवार येथे अटक केलीे. सुधाकर उर्फ चंद्रशेखर उईके (वय ३५) असे आरोपीचे नव असून, तो आर्वी तालुक्यातील लादगड येथील रहिवासी आहे.अकोला रेल्वे स्थानक परिसरात एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्यावरून चाइल्ड लाइनच्या मदतीने अकोला लोहमार्ग पोलिसांनी त्याला ठाण्यात आणले होते. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कार्यवाही सुरू असताना पोलिसांची नजर चुकवून हा आरोपी पसार झाला. लोहमार्ग पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी तातडीने अकोला येथे भेट देऊन आरोपीच्या शोधासाठी सहा पथके गठित केली होती. यातील एका पथकातील दीपक डोर्लीकर यांना आरोपी कारंजा घाडगे तालुक्यातील कन्नमवार येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. या आरोपीने तेथे आपल्या एका मित्राकडे आश्रय घेतला होता. मात्र त्याच्याच घरी चोरी करून तो तेथून पळाला. पथकाने ३१ ऑगस्ट रोजी कन्नमवार येथे त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला. त्यामुळे त्याच्या मुसक्या बांधून त्याला रेल्वे पोलिस अकोला यांच्या सुपुर्द करण्यात आले. ही कारवाई लोहमार्ग पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, सहायक पोलिस निरीक्षक कविकांत चौधरी, पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलिस हवालदार डोर्लीकर, शहारे, शिपाई त्रिवेदी, राऊत, खोब्रागडे, तितरमारे यांनी केली.
लोहमार्ग पोलिसांच्या कोठडीतून फरार आरोपीला चार दिवसात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 9:31 PM
अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणात अकोल्यात अटक करण्यात आल्यानंतर फरार झालेल्या आरोपील नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारंजा घाडगे तालुक्यातील कन्नमवार येथे अटक केलीे.
ठळक मुद्देअल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोपी