शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
4
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
5
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
6
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
7
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
8
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
10
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
11
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
12
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
13
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
14
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
15
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
16
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
17
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
18
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
19
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
20
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

सौदीत पळून जाऊ पाहणा-या आरोपीस पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 10:17 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉ कॉलेज चौकात सुरू होण्याच्या तयारीत असलेल्या एका बहुमजली ईमारतीतील हॉटेल पेटवून देणा-या चार पैकी एका आरोपीच्या सीताबर्डी पोलिसांनी मुसक्या बांधल्या. तो सौदी अरेबियात पळून जाण्याच्या तयारीत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्टीय विमानतळावर पोलिसांनी त्याला अटक केली. या कारवाईमुळे बुधवारी रात्री विमानतळावर एकच खळबळ उडाली होती.रोशन ...

ठळक मुद्देविमानतळावरून अटक : हॉटेल पेटविल्याचे प्रकरण : सीताबर्डी पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉ कॉलेज चौकात सुरू होण्याच्या तयारीत असलेल्या एका बहुमजली ईमारतीतील हॉटेल पेटवून देणा-या चार पैकी एका आरोपीच्या सीताबर्डी पोलिसांनी मुसक्या बांधल्या. तो सौदी अरेबियात पळून जाण्याच्या तयारीत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्टीय विमानतळावर पोलिसांनी त्याला अटक केली. या कारवाईमुळे बुधवारी रात्री विमानतळावर एकच खळबळ उडाली होती.रोशन कयुम गणी शेख (वय २९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो टीएमटी कॉलनी, गिट्टीखदानमधील रहिवासी आहे. १२ मार्चला पहाटेच्या सुमारास लॉ कॉलेज चौकातील एका ईमारतीत अर्जूनसिंह छाबरा आणि पवन सुभाष निरभात यांनी हॉटेलचा व्यवसाय सुरू करण्याची तयारी चालवली होती. त्यासाठी फर्निचर आणि इंटेरियर डेकोरेशनचे कामसुरू होते. १२ मार्चला पहाटेच्या सुमारास या हॉटेलला भीषण आग लागली. आगीत फर्निचरसह अन्य साहित्याचीही राखरांगोळी झाली. आग एवढी भीषण होती की अग्निशमन दलाच्या १४ बंबांनी चार तास प्रयत्न केल्यानंतर आग विझविण्यात यश मिळाले होते. ही आग लागली नाही तर प्रतिस्पर्धी व्यवसायिकाने लाग लावल्याचा संशय छाबराने तक्रारीतून व्यक्त केला होता. दरम्यान, आग लावण्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यात चार आरोपीही दिसत होते. सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेणे सुरू केले. सीसीटीव्हीत दिसणारांपैकी रोशन कयूम गणी शेखला फिर्यादीने ओळखले. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. तो विमानाने सौदी अरेबियाला पळून जात असल्याची माहिती बुधवारी रात्री ठाणेदार हेमंत खराबे यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी सहका-यांसह तिकडे धाव घेतली. त्यानंतर रोशनला रात्री ९.५० वाजता विमानतळावर अटक करण्यात आली.विमानतळ प्रशासनाला माहितीमुंबई मार्गे सौदीला जाणारे जेट एअरवेजचे विमान नागपूर विमानतळाहून ९.४५ वाजता उडणार होते. या विमानाने आरोपी रोशन पळून जाणार असल्याची माहिती ठाणेदार खराबे यांना ९ वाजून ३५ मिनिटांनी मिळाली. १० मिनिटात विमानतळावर पोहचून आरोपीला ताब्यात घेणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी विमानतळ प्रशासनाला ही माहिती दिली. त्यांनी सीआरपीएफच्या जवानांच्या माध्यमातून आरोपी रोशनला विमानतळावर ताब्यात घेतले. त्यानंतर तेथे पोहचलेल्या सीताबर्डी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. एजंट जॅक पुणे या कंपनीची फ्रेंचायची आरोपी रोशनला मिळणार होती. तो तेथे हॉटेल लावणार होता. मात्र, ऐन वेळी ही फ्रेचायची छाबराने मिळवली. त्याचा सूड घेण्यासाठी आरोपींनी त्याचे हॉटेलच जाळून टाकले.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसArrestअटक