लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - ओळखीच्या व्यक्तीने सदनिका घेऊन देण्याची थाप मारली. १३ लाख रुपये घेतले आणि याबाबत जाब विचारला असता लज्जास्पद वर्तन करून मारहाण केली, अशी तक्रार एका महिलेने (वय ३५) अजनी ठाण्यात नोंदवली.
संजय नत्थूजी रहाटे आणि तक्रार करणारी महिला हे दोघे एकमेकांना ओळखतात. त्यांच्यात चांगले संबंध होते तेव्हा आरोपीने आपल्याला सदनिका घेऊन देतो, असे सांगून आपल्याकडून १३ लाख रुपये घेतले. सदनिका मात्र घेऊन दिली नाही. प्रत्येक वेळी थाप मारून टाळले. त्यामुळे महिला तिच्या दोन मैत्रिणींसह बुधवारी सकाळी रहाटेच्या घरी गेली. तेथे त्यांच्यात वाद झाल्यानंतर आरोपीने महिलेला लज्जास्पद वर्तन करून मारहाण केली. त्यामुळे महिलेने अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी रहाटेविरुद्ध विनयभंग करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
---