शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

आरोपीला कारावासाऐवजी १० हजार रुपये दंड

By admin | Published: November 02, 2015 2:16 AM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका आरोपीला कारावासाची शिक्षा देणे टाळून १० हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावला आहे.

हायकोर्ट : शस्त्राने गंभीर जखमी करण्याचे प्रकरणनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका आरोपीला कारावासाची शिक्षा देणे टाळून १० हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावला आहे. १९९४ मध्ये आरोपीने एका व्यक्तीला तलवारीने मारून गंभीर जखमी केले होते. ही घटना वाडी येथील आहे.नागो ऊर्फ शेषराव इस्तारी गवळी (६०) असे आरोपीचे नाव असून तो वाडी येथील रहिवासी आहे. २५ आॅक्टोबर १९९९ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३२४(घातक शस्त्राने जखमी करणे)अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास व ३००० रुपये दंड आणि दंड जमा न केल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. या आदेशाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने हे प्रकरण फार जुने असल्याने व इतर विविध बाबी लक्षात घेता आरोपीचा दोष कायम ठेवून त्याने आतापर्यंत भोगली तेवढ्याच कारावासाची शिक्षा सुनावली; तसेच १० हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावून ही रक्कम सत्र न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले आणि हा दंड जमा न केल्यास दोन वर्षे कारावासाची शिक्षा कायम राहील असे स्पष्ट केले. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्वाळा दिला. सुरुवातीचे काही दिवस कारागृहात राहिल्यानंतर आरोपी १९९४ पासून जामिनावर बाहेर आहे. त्याने याचा गैरफायदा घेतला नाही, ही बाब न्यायालयाने निर्वाळा देताना लक्षात घेतली आहे.(प्रतिनिधी)अशी घडली घटनाफिर्यादीचे नाव सदाशिव राऊत असून सत्र न्यायालयात खटला प्रलंबित असताना त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. पोलिसांनी त्याच्या मृत्यूची चौकशी केलेली नाही. त्याने जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात पोहोचून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली होती. १४ मे १९९४ रोजी आरोपी तलवार हातात घेऊन हंगामा करीत होता. सदाशिव तेथे गेला असता आरोपीने त्याच्यावर हल्ला केला होता.