लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाल्या बिनेकर यांच्या शरीरावर कुख्यात चेतन हजारे आणि त्याच्या साथीदारांनी २५ पेक्षा जास्त घाव घालून त्याच्या शरीराची अक्षरश: चाळणी केली. दरम्यान, त्यांनी हा गुन्हा कुणाच्या सांगण्यावरून केला ते उघड करण्यासाठी पोलिस कामी लागले आहेत. नागपूरकरांना हादरवून सोडणाऱ्या आणि अनेकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या बाल्या बिनेकर हत्याकांडातील आरोपींची सीताबर्डी पोलीस चौकशी करीत आहेत. परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू यांनी आज सकाळी गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. बाल्याने आपल्या वडिलांची हत्या केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी आपण बाल्याची हत्या केल्याचे आरोपी चेतन हजारे पोलिसांना सांगत आहे. मात्र पोलिसांना हे कारण खरे वाटत नाही. थोड्या वेळासाठी चेतन हजारेचे समजण्यासारखे असले तरी अन्य आरोपी इतक्या निर्दयपणे बाल्यावर कसे काय तुटून पडले, त्यांची कोणती दुश्मनी होती, हा प्रश्न आरोपींच्या कथनावर संशय वाढवणारा आहे आणि म्हणूनच पोलीस वेगवेगळ्या अँगलने आरोपींना बोलते करण्याचा प्रयत्न करीत आहेत.या पार्श्वभूमीवर दुपारी पीसीआर मिळवल्यानंतर ठाणेदार जगवेंद्र राजपूत यांनी बाल्याला का मारले, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आरोपींची चौकशी सुरू केली. दरम्यान, बाल्याच्या शरीराची चाळणी करून पळालेल्या आरोपींनी शस्त्रे कुठे लपविली, त्यांनी ती शस्त्रे कुणाजवळून आणली होते, माऊझर कुठून मिळवले होते, त्याचाही पोलिस शोध घेत आहेत. रात्रभरातून आरोपींकडून शस्त्रे जप्त केली जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.या थरारक हत्याकांडात पडद्यामागचा सूत्रधार दुसराच कुणी असावा असा संशय आहे. तशी जोरदार चर्चा गुन्हेगारी वर्तुळात आणि पोलिस दलातही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, गुन्हेगारी वर्तुळात वेगळीच धावपळ सुरू असल्याचीही माहिती आहे.क्राइम मीटिंगमध्येही बाल्याचआज शहर पोलीस दलाची क्राईम मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि सर्व ठाणेदार उपस्थित होते. मीटिंगमध्येही बाल्या बिनेकर हत्याकांड चर्चेला आले. पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व गुन्हेगार वठणीवर आणा आणि अवैध धंदे बंद करा, अशा कडक शब्दात पोलीस अधिकाऱ्यांना सूचनावजा निर्देश दिले.
आरोपींनी बनविली बाल्याच्या शरीराची चाळणी : २५ पेक्षा जास्त घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:00 AM
बाल्या बिनेकर यांच्या शरीरावर कुख्यात चेतन हजारे आणि त्याच्या साथीदारांनी २५ पेक्षा जास्त घाव घालून त्याच्या शरीराची अक्षरश: चाळणी केली. दरम्यान, त्यांनी हा गुन्हा कुणाच्या सांगण्यावरून केला ते उघड करण्यासाठी पोलिस कामी लागले आहेत.
ठळक मुद्देरात्रीतून होणार शस्त्रे जप्त