लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनदरम्यान रेल्वेची ‘ओएचई’ वायर चोरी करून ते भंगार व्यावसायिकाला विकणाºया ४ आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहात अटक केली असून त्यांच्याकडून ५५,८८० रुपये किमतीची वायर जप्त केली आहे.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या घडेला ते भीमालगोंडी दरम्यान मागील २ महिन्यांपासून लॉकडाऊनचा फायदा घेऊन अज्ञात आरोपींनी ३ वेळा रेल्वेच्या ओएचई वायरची चोरी केली. आरोपींना पकडण्यासाठी छिंदवाडाचे निरीक्षक एम. के. सिंह तसेच नागपूरच्या गुन्हे शाखेच्या डिटेक्टिव्ह विंगचे निरीक्षक विकास कुमार आणि चमूचे गठन करण्यात आले. विभागीय सुरक्षा आयुक्त ए. के. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. १० जूनला आरपीएफच्या चमूने घडेला ते भीमालगोंडी दरम्यान रात्री गस्त घातली. यावेळी किलोमीटर क्रमांक १३१३/९-१० येथील अंडरब्रीजजवळ काही व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी ओएचई वायर चोरी करून विकल्याची कबुली दिली. आतापर्यंत ३ वेळा चोरी करून २६५ मीटर केबल चोरी केला. आरपीएफने एकूण ६ आरोपींना अटक करून ५५,८८० रुपयांचा वायर जप्त केला. आरोपींविरुद्ध रेल्वे अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपुरात ‘ओएचई’ वायर चोरी करणाऱ्या आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 8:02 PM
लॉकडाऊनदरम्यान रेल्वेची ‘ओएचई’ वायर चोरी करून ते भंगार व्यावसायिकाला विकणाºया ४ आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहात अटक केली असून त्यांच्याकडून ५५,८८० रुपये किमतीची वायर जप्त केली आहे.
ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : घडेला ते भीमालगोंडी दरम्यानची घटना