मेव्हणीच्या अवघ्या एक महिन्याच्या नवजात बाळाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: May 22, 2023 07:00 PM2023-05-22T19:00:41+5:302023-05-22T19:01:11+5:30

Nagpur News सोबत नांदत नसलेल्या पत्नीवरील रागातून साळीच्या एक महिन्याच्या मुलाचा खून करणाऱ्या क्रूरकर्मा आरोपीला सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

Accused who murdered sister-in-law's one-month-old newborn baby gets life imprisonment | मेव्हणीच्या अवघ्या एक महिन्याच्या नवजात बाळाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

मेव्हणीच्या अवघ्या एक महिन्याच्या नवजात बाळाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

googlenewsNext


राकेश घानोडे

नागपूर : सोबत नांदत नसलेल्या पत्नीवरील रागातून साळीच्या एक महिन्याच्या मुलाचा खून करणाऱ्या क्रूरकर्मा आरोपीला सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला व दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. सत्र न्यायालयाचे न्या. एस. ए. एस. एम. अली यांनी हा निर्णय दिला. ही हृदयद्रावक घटना २०१९ मध्ये पारशिवणीपासून २० किलोमीटर लांब असलेल्या बखारी (पिपळा) गावात घडली.

गणेश गोविंद बोरकर (४५) असे आरोपीचे नाव असून तो वडाेदा रोड, कुही येथील रहिवासी आहे. ताे २० ऑगस्ट २०१९ पासून कारागृहात आहे. बोरकर व त्याची पत्नी प्रतिभा यांचे एकमेकांसोबत पटत नव्हते. त्यामुळे प्रतिभा बखारी (पिपळा) येथे माहेरी राहायला गेली होती. दरम्यान, प्रतिभाची भामेवाडा, ता. कुही येथील लहान बहीण रुपाली पांडे (२८) हिने मुलाला जन्म दिला. त्यामुळे आई-वडिलांनी तिला आराम करण्यासाठी माहेरी आणले होते. १९ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी रुपाली तिच्या मुलासह घरी होती. त्यावेळी आरोपी तेथे गेला व प्रतिभा कोठे आहे, अशी विचारणा केली. रुपालीने प्रतिभा मजुरीच्या कामासाठी शेतात गेल्याचे सांगितल्यानंतर आरोपीने तिला रुमाल धुवून मागितला. रुपाली नवबाळंतीन असल्यामुळे ती रुमाल धुण्यासाठी शेजारच्या बाईकडे गेली. तिचा मुलगा घरात झोपला होता. आरोपीने त्याचा पोटात चाकू भोसकून खून केला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. पंकज तपासे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी ९ साक्षीदारांचे जबाब व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.

Web Title: Accused who murdered sister-in-law's one-month-old newborn baby gets life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.