शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
2
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
3
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
4
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
5
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
6
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
7
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
8
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
9
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
10
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
11
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
12
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
13
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत
15
"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला
16
IND vs SA FINAL : पंतचा मास्टरप्लॅन! ३० चेंडूत ३० धावा हव्या असताना केलं 'नाटक', रोहितचा मोठा खुलासा
17
धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...
18
"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'
19
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
20
BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 

अन्ननलिकेच्या पुनर्जनन प्रयत्नाला यश

By admin | Published: January 11, 2015 12:49 AM

अन्ननलिकेच्या पुनर्जननच्या (रिजनरेशन) प्रयत्नाला पहिल्यांदाच यश प्राप्त झाले आहे. प्लुरीपोटेंट स्टेम सेल्स म्हणजेच दुसऱ्या पेशींना जन्म देणाऱ्या मूळपेशींमुळे हे शक्य झाले आहे,

कुलविंदर दुवा यांची माहिती : दोन दिवसीय ‘गॅस्ट्रोकॉन-२०१५’ परिषदेला सुरुवात नागपूर : अन्ननलिकेच्या पुनर्जननच्या (रिजनरेशन) प्रयत्नाला पहिल्यांदाच यश प्राप्त झाले आहे. प्लुरीपोटेंट स्टेम सेल्स म्हणजेच दुसऱ्या पेशींना जन्म देणाऱ्या मूळपेशींमुळे हे शक्य झाले आहे, अशी माहिती अमेरिकेतील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. कुलविंदर दुवा यांनी दिली. मिडास मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूरच्या वतीने आयोजित ‘गॅस्ट्रोकॉन-२०१५’ परिषदेला शनिवारपासून सुरुवात झाली. या परिषदेच्या औपचारिक उद्घाटनानंतर ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. दुवा म्हणाले, संसर्ग झाल्याने एका इसमाची अन्ननलिका पाच सेंटीमीटरपर्यंत कापावी लागली. अन्ननलिका व पोटाचा आकार कायम ठेवत कापलेल्या जागी स्टेन्थ टाकण्यात आली. चार वर्षांनंतर स्टेन्थच्या जागेवर अन्ननलिकेचे रिजनरेशन झाल्याचे आढळून आले. भारतात अन्ननलिकेचा कॅन्सर वाढत आहे. यात अनेकदा अन्ननलिका कापावी लागते. परिणामी अन्ननलिका आणि स्टमक याच्या मूळ आकारात बदल होतो; शिवाय रुग्णाला अनेक दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागते. यात ही पद्धत उपयोगी पडण्याची शक्यता आहे. ‘फॅटी लिव्हर’चा धोका मिडास मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक व या परिषदेचे आयोजन सचिव डॉ. श्रीकांत मुकेवार म्हणाले, लिव्हर (यकृत) स्थूलता (फॅटी) असणे हे सामान्य मानले जाते, परंतु असे नाही. फॅटी लिव्हर कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते. बदलत्या जीवनशैलीमुळे ‘फॅटी लिव्हर’चा आजार बळावत आहे. अत्यंत गभीर यकृतच्या आजाराच्या कारणांपैकी हा आजार समोर आला आहे. ‘फॅटी लिव्हर’ हा आजार रोखता येण्यासारखा आहे. फक्त सुरुवातीच्या टप्प्यात केवळ जीवनशैलीत बदल करावा लागतो. नियमित व्यायाम व स्थुलतेवर लक्ष ठेवल्यास हा आजार उद्भवत नाही. भारतात दारूशी संबंधित यकृताचा आजार सर्वाधिक आहे. दारू सेवन करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत महिलांना यकृताचा आजार लवकर होण्याची शक्यता असते. हेपिटायटिस ‘सी’ विषाणुबाधेचा प्रसार भारतात व्यापक प्रमाणात आढळतो. १०० जणामध्ये प्रत्येक तिसरा व्यक्ती या आजाराने बाधित आहे. कोणत्याही साथीच्या आजारातही देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात रोगाची लागण होत नाही किंवा रु ग्ण मरत नाही. म्हणूनच हेपिटायटिस ‘सी’ विषाणुबाधा ही भारतातील एक अत्यंत गंभीर आरोग्य समस्या आहे. यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)परिषदेत ९५० डॉक्टरांचा सहभाग दोन दिवसीय ‘गॅस्ट्रोकॉन’ परिषदेत विदर्भ आणि मध्य प्रदेशातील जवळपास ९५० डॉक्टर सहभागी झाले आहेत. यासोबतच आंतरराष्ट्रीय वक्ते इंग्लंडचे डॉ. जे.बी. दिलावरी, डॉ. कुलविंदर दुवा, पीजीआय चंदीगडचे संचालक डॉ. योगेश चावला. आशियन इन्स्टिट्यूट आॅफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, हैदराबादचे संचालक डॉ. डी. नागेश्वर रेड्डी, बलवेव इन्स्टिट्यूट आॅफ डायजेस्टिव्ह सायन्सेसचे मुख्य एन्डोस्कोपिस्ट डॉ. अमित मेदेव, मेदांता इन्स्टिट्यूट, नवी दिल्लीचे गॅस्ट्रोएन्टरोलॉजीचे संचालक डॉ. रणधीर सूद आदींचा समावेश आहे. मिडास मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूटच्यावतीने वर्षातून दोनदा अशा परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. मुकेवार यांच्यासह डॉ. वैभव गंजेवार, डॉ. भाऊ राजूरकर, डॉ. शरद देशमुख आणि डॉ. विजय वर्मा आदी सहकार्य करीत आहेत.