शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

‘मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या प्रकरणात अधिकारानुसार कृती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 5:22 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीवरील आक्षेप व तक्रारीवर अधिकारानुसार कृती केली असे उत्तर निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीवरील आक्षेप व तक्रारीवर अधिकारानुसार कृती केली असे उत्तर निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले.भारतीय निवडणूक आयोगाने उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र वेबसाईटवर अपलोड करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार इतरांसह फडणवीस यांचेही प्रतिज्ञापत्र वेबसाईटवर अपलोड करण्यात आले होते. या प्रतिज्ञापत्रावर अ‍ॅड. सतीश उके यांनी ३ आॅक्टोबर रोजी आक्षेप नोंदवले होते. त्यामुळे उके यांना विरुद्ध प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर उके यांनी ४ आॅक्टोबर रोजी दाखल केलेले विरुद्ध प्रतिज्ञापत्रही वेबसाईटवर अपलोड केले. तसेच, उके यांच्या २ आॅक्टोबरच्या तक्रारीची माहिती ४ आॅक्टोबर रोजी फडणवीस यांना कळविण्यात आली. तसेच अन्य कारवाई करण्याचे अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांना नव्हते. प्रतिज्ञापत्रातील माहिती खरी आहे की खोटी, हे तपासण्यासाठी चौकशीचे अधिकार निवडणूक अधिकाºयांना नाही. त्यामुळे उके यांना प्रतिज्ञापत्रातील माहितीसंदर्भात आक्षेप असल्यास त्यांनी सक्षम प्राधिकाºयाकडे जायला हवे, असे निवडणूक अधिकाºयांच्या उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.या प्रकरणात कायद्यानुसार कारवाई झाली नसल्याचा उके यांचा आरोप असून त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उके या उत्तरावर प्रत्युत्तर दाखल करणार असून त्यासाठी त्यांनी न्यायालयाला दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला.>याचिकेतील आरोप : फडणवीस यांनी निवडणुकीत खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यांच्याविरुद्धच्या दोन फौजदारी प्रकरणांचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला गेला नाही. ती माहिती त्यांनी जाणीवपूर्वक लपवून ठेवली असे उके यांचे आरोप आहेत. फडणवीस यांच्यावर लोक प्रतिनिधित्व कायद्यातील कलम १२५-ए व फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९५ अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.

टॅग्स :nagpurनागपूर