लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतूक पोलिसांनी २६ ते २८ जुलै २०१७ या कालावधीत विशेष मोहीम राबवून २ हजार ९४२ अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तसेच, ६२६ अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांच्या नावाने चालान फाडले आहे.विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आले. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व मध्य विभागासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. अपघात टाळण्यासाठी आवश्यक तेथे योग्य उंचीचे स्पीड ब्रेकर्स व साईन बोर्ड लावण्याचे निर्देश मनपाला देण्यात आले आहेत. १ ते ३१ जानेवारी २०१७ या कालावधीत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या २७ हजार ७८३ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिकवेळा दारू पिऊन वाहन चालविणारे ५२ जण आहेत. याशिवाय विभागीय आयुक्तांनी बैठकीमध्ये विविध मुद्यांवर आदेश दिले व सूचना केल्या. न्यायालयाने त्यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. याप्रकरणात अॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र आहेत.वाठोड्यात नंदग्राम प्रकल्पशहरातील जनावरांचे गोठे स्थानांतरित करण्यासाठी नंदग्राम प्रकल्पांतर्गत वाठोडा येथे ४४.०६ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी ४६८० जनावरांना गोठे उपलब्ध होऊ शकतात.६१ शिकवणी वर्गांना नोटीसशहरात ६६ खासगी शिकवणी वर्ग असून त्यापैकी ६१ शिकवणी वर्गांना पार्किंग समस्येबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ६१ मधील १२ शिकवणी वर्गांनी पार्किंगची व्यवस्था केली आहे. इतरांना यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
नागपुरात २ हजार ९४२ अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:42 PM
वाहतूक पोलिसांनी २६ ते २८ जुलै २०१७ या कालावधीत विशेष मोहीम राबवून २ हजार ९४२ अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तसेच, ६२६ अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांच्या नावाने चालान फाडले आहे.विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आले. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
ठळक मुद्देहायकोर्टात माहिती : ६२६ पालकांच्या नावाने फाडले चालान