लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यांची होत असलेली दुर्दशा व वाढते अपघात थांबविण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक (ओव्हरलोड) करणाऱ्या ३३६ मालवाहू वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) नागपूर शहरने कारवाई केली. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यातील या कारवाईमुळे ९५ लाखांच्या महसुलात भर पडली.शहरात मोठ्या प्रमाणात क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणारी वाहने दृष्टीस पडतात. शिवाय, नियमांचे उल्लंघन करीत अनेक खासगी बसेस मालवाहतूक करताना आढळून येतात. याच्या तक्रारी वाढल्याने ‘आरटीओ’ कार्यालयांनी कंबर कसली आहे. शिवाय, परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार शहर आरटीओने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, एप्रिल महिन्यात २८ वाहनांवर, मे महिन्यात ३५, जून महिन्यात २७, जुलै महिन्यात ५, आॅगस्ट महिन्यात १०४, सप्टेंबर महिन्यात ५९ तर आॅक्टोबर महिन्यात ७८ अशा एकूण ३३६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यातील २६० वाहनांना अडकवून ठेवण्यात आले होते. तडजोड व विभागीय शुल्क आकारून या वाहनांवर ९५.०१ लाखांची वसुली करण्यात आली.अवैध प्रवासी वाहतूक करणारी ४६ वाहने जप्तशहर आरटीओ कार्यालयाने ओव्हरलोड वाहनांसोबतच अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात ६३५ वाहने तपासण्यात आली यातील २२९ दोषी वाहनांवर कारवाई केली. यातील ४६ वाहनांवर जप्तीची कारवाई करीत ७.७९ लाखांचे शुल्क आकारले.कारवाई आणखी तीव्र करणारगेल्या सात महिन्यात ओव्हरलोड वाहनांवर झालेली कारवाई समाधानकारक आहे. पुढील महिन्यापासून ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे. या कारवाईच्या संदर्भात समाजविघातक अनेकवेळा अपप्रचार करतात, यामुळे वाहनचालकांनी याला बळी पडू नये. वाहनचालकांच्या काही तक्रारी असल्या तर त्यांनी कार्यालयाला द्याव्यात.बजरंग खारमाटेप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर
नागपुरात ३३६ ओव्हरलोड वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:31 PM
रस्त्यांची होत असलेली दुर्दशा व वाढते अपघात थांबविण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक (ओव्हरलोड) करणाऱ्या ३३६ मालवाहू वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) नागपूर शहरने कारवाई केली. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यातील या कारवाईमुळे ९५ लाखांच्या महसुलात भर पडली.
ठळक मुद्देशहर आरटीओ : ९५ लाखांची वसुली