लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या बुधवारी नागपूर दौऱ्यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते दीक्षाभूमीपर्यंत मोटारसायकल रॅली काढली. यात सहभागी ५२ कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून त्यांच्यावर नजर ठेवत गुरुवारी त्यांच्या घरी चालान पाठविले.नागपूर विमानतळावर जे.पी. नड्डा यांचे आगमन झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या उपस्थितीत विमानतळ येथून मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली. वर्धा रोडने रॅली दीक्षाभूमी चौकात आली. यावेळी रॅलीत काही कार्यकर्ते विना हेल्मेट तर काही ट्रिपल सीट सहभागी झाले होते. वाहतूक पोलिसांनी गुरुवारी या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहत मोटार सायकलवरील नंबर प्लेटवरून संबंधितांना चालान पाठविले. अशा ५२ चालकांवर कारवाई करण्यात आली.हेल्मेट घालून येण्याच्या दिल्या होत्या सूचनाजे.पी. नड्डा यांच्या सहभाग असलेल्या मोटार सायकल रॅलीमध्ये सहभागी कार्यकर्त्यांना हेल्मेट घालूनच सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. प्रभागस्तरावरील अध्यक्षांनी ‘व्हॉटस अॅप’वर तसा मॅसेज टाकून याची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवली होती. परंतु त्यानंतरही अनेक कार्यकर्ते विना हेल्मेट तर काही ट्रिपल सीट सहभागी झाल्याचे सांगण्यात येते.
भाजप रॅलीतील ५२ चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:48 PM
भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या बुधवारी नागपूर दौऱ्यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी रॅली काढली. यात सहभागी ५२ कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. वाहतूक पोलिसांनी त्यांच्या घरी चालान पाठविले.
ठळक मुद्देसीसीटीव्ही कॅमेऱ्याची घेतली मदत