शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
5
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
6
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
7
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
9
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
10
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
11
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
12
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
13
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
14
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
15
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
16
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
17
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
18
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
19
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
20
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न

दूधात भेसळ करणाऱ्या ९ जणांवर कारवाई; २२५० लिटर दूध नष्ट, विक्रेत्यांचे धाबे दणाणले

By मोरेश्वर मानापुरे | Updated: September 12, 2023 02:26 IST

काही नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणी मोहिमेत कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

नागपूर : सणासुदीच्या काळात नागरिकांना शुद्ध दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ मिळावेत, या उद्देशाने यंदा राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात दूधात भेसळ करणाऱ्यांवर धडक तपासणी मोहीम १ सप्टेंबरपासून सुरू केली आहे. याअंतर्गत नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ९ डेअरीमध्ये भेसळयुक्त दूध आणि मिठाइृ आढळून आली. रामटेकमध्ये २२५० लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. काही नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणी मोहिमेत कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

अपर जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्षअपर जिल्हाधिकारी आशा पठाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन या समितीत अपर पोलीस अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आणि वैधमापनशास्त्र उपनियंत्रक हे सदस्य तर जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी सदस्य सचिव आहेत. दूध संस्था, संकलन केंद्र्र, प्रोसेसिंग प्रकल्प, दूध व दूग्धजन्य पदार्थ पुरवठा करणारे, निर्मिती करणारे, विक्री करणारे, स्विट मार्ट, इतर संबंधित उद्योजक यांच्या तपासण्या धडक मोहिमेंतर्गत करण्यात येत आहे. धडक मोहिमेद्वारे कुणालाही त्रास देण्चाचा उद्देश नसून दूध उत्पादक व दूध, दूग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांनी शुद्ध दर्जाचे दूध व दूग्धजन्य पदार्थ ग्राहकांना द्यावेत, हा यामागील उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी समितीकडे करावी तक्रारदूध व दूग्धजन्य पदार्थाच्या वापराच्या पॅकेट्सवर अथवा डब्यांवर तारीख स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे. मुदतबाह्यपदार्थ विक्रीसाठी ठेवू नये. तपासण्यांमध्ये तसा प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व नियमन २०११ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. भेसळ आढळल्यास जनतेने समितीकडे तक्रार करावी, असे आवाहन समिती सदस्यांनी केले आहे.

किटद्वारे जागेवर होते दूधाची तपासणीतपासणी मोहिमेदरम्यान समितीचे सदस्य व अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी जागेवरच विशेष किटद्वारे दूधाची तपासणी करतात. दूधात भेसळ आढळून आल्यास दूध जागेवरच नष्ट करण्यात येते. किटद्वारे दूधातील यूरिया, स्टार्च, शुगर, सॉल्ट, आणि दूध पावडरचे प्रमाण तपासले जाते. प्रमाणापेक्षा जास्त भेसळयुक्त पदार्थ आढळून आल्यास विक्रेत्यांवर कारवाई करून खटले दाखल करण्यात येतात.

दूधात पावडरची भेसळतपासणी मोहिमेदरम्यान काही ठिकाणी पॅकिंगवर मेड इन युरोप लिहिलेले पावडर दूधात मिसळले जात असल्याचे समितीला आढळून आले आहे. अशांवरही कारवाई करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :milkदूधnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी