शहरं
Join us  
Trending Stories
1
तेव्हा गृहखातं आमच्याकडेच ठेवलं असतं तर...; संजय राऊतांना आठवला फडणवीसांचा सल्ला
2
लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा; २१०० रुपये कधी जमा होऊ शकतात? जाणून घ्या...
3
पहिल्याच पोस्टिंगवर रुजू होण्यासाठी निघालेले; आयपीएस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
4
विजयानंतर चित्र बदलले, अजित पवार गटात पक्षप्रवेशासाठी रांग, या पराभूत उमेदवारांनी घेतली भेट
5
'मुलाची सर्व गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्त केले' ट्रम्प यांनी बायडेन यांच्या निर्णयावर टीका केली; म्हणाले, 'अधिकारांचा गैरवापर केला'
6
"श्रीकांत शिंदेंचा उपमुख्यमंत्रीपदाशी संबंध नाही"; शिवसेना खासदाराने दिलं स्पष्टीकरण
7
विद्यार्थ्यांसाठी APAAR ID योजना राबविण्यास सुरुवात; आयुष्यभर उपयोगी ठरणार..., फायदा काय
8
या पाच प्रश्नांमुळे एकनाथ शिंदे चिंतीत, त्यामुळेच फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद देण्यास घेताहेत आढेवेढे
9
IPL 2025 साठी 'KKR है तैयार'! अनसोल्ड टॅग लागलेला Ajinkya Rahane कॅप्टन्सीसाठी पहिली पसंती
10
Adani Green Energy Share: आरोपांनंतरही अदानींचा 'हा' शेअर सुस्साट; ४ दिवसांत ६०% वाढला स्टॉक; आजही मोठी तेजी
11
अवध ओझा राजकारणात करणार एन्ट्री! कोणत्या पक्षात प्रवेश करणार?
12
विधानसभेत मी मैदानात असतो आणि समीकरणं जुळली असती तर...; जरांगेंचा नव्या सरकारला इशारा
13
"त्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा रद्द केली"; संजय गायकवाडांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री जाधवांचं प्रत्युत्तर
14
Rajesh Power Services IPO : पहिल्याच दिवशी पैसा झाला दुप्पट; 'या' IPO नं केला १००% चा फायदा; कोणता आहे शेअर?
15
'तो' शब्द बोलणं अल्लू अर्जुनला पडलं महागात! 'पुष्पा 2' फेम अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?
16
२० जिल्ह्यातील शेतकरी दिल्लीकडे करणार कूच; चिल्ला बॉर्डरवर वाहतूक कोंडी, पोलीस अलर्ट
17
'पुष्पा २'साठी पुन्हा एकदा श्रेयस तळपदे बनला अल्लू अर्जुनचा आवाज, म्हणाला- "फ्लॉवर नहीं, फायर है मेंपासून..."
18
मुंबई-मँचेस्टर विमानाचे कुवैतमध्ये इमर्जन्सी लँडिंग; ६० भारतीय १३ तास अडकले
19
९५ चेंडूत ५ धावा खर्च करत ४ विकेट्स! या गोलंदाजानं उमेश यादवचा रेकॉर्ड मोडला, पण..
20
सत्तेच्या बाहेर राहण्याचा एकनाथ शिंदेंचा विचार, परंतु...; भरत गोगावलेंचं विधान

रेल्वेच्या ई-तिकिटांचा अवैध आरक्षण करणाऱ्याविरुद्ध कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 4:39 PM

रेल्वे तिकिटांचे अवैध बुकिंग : ५४ तिकिटांसह दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर :रेल्वेच्यातिकिटाचे अवैध आरक्षण करून मिळविलेल्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका आरोपीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५४ ई- तिकिटे तसेच मोबाइल जप्त करण्यात आला. आरोपीचे नाव शुभम कमलाकर सूर्यवंशी असून तो बिनाकी ले-आऊटमधील यादवनगरात राहतो. आरोपीचे चिकन शॉप आहे. त्या आडून तो हा गोरखधंदा करीत असल्याचे उघड झाले आहे.

रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणारे एक मोठे रॅकेट अनेक वर्षांपासून नागपुरात सक्रिय आहे. हे आरोपी त्यांच्या संपर्कातील व्यक्तीच्या युजर आयडीचा गैरवापर करून वेगवेगळ्या मार्गावरच्या, वेगवेगळ्या गाड्याची तिकीटे तयार करतात आणि गरजू प्रवाशांना त्या विकतात. 

एका तिकिटावर हे दलाल तीनशे ते पाचशे रुपये जास्त घेतात. अशाप्रकारे घरबसल्या ही मंडळी रोज हजारो रुपये कमवत असतात. वर्धमाननगर, गांधीबाग, जरीपटका, सदर, लकडगंज, धरमपेठ, खामला, सीताबर्डीसह अन्य काही भागांत अशा दलालांचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. कारवाईचे अधिकार असणाऱ्या संबंधितांपैकी अनेकांना त्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्याशी मधुर संबंध असल्यामुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर धडक कारवाई होताना दिसत नाही. 

सहा लाइव्ह तिकिटे, ४८ जुनी तिकिटे जप्त रेल्वे पोलिसांच्या एका पथकाला गुरुवारी ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली. त्यावरून सहायक पोलिस उपनिरीक्षक अश्विन पवार, मुकेश राठोड, सचिन दलाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींना आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून रेल्वेचे सहा लाइव्ह तिकीट तसेच ४८ जुने तिकीट तसेच मोबाइल जप्त करण्यात आला. एका तिकिटावर आपण २०० ते ३०० रुपये जास्त घेऊन हे तिकीट अवैधपणे रेल्वे प्रवाशांना विकत असल्याची माहितीवजा कबुली आरोपीने पोलिसांना दिली. त्याच्याविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम २४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :railwayरेल्वेticketतिकिटnagpurनागपूर