शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
5
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
6
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
7
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
8
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
9
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
10
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
11
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
12
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
13
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
14
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
15
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
16
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
17
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
18
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
19
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
20
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?

नागपुरात उघड्यावर लघवी व थुंकणाऱ्या २३८४ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 1:08 AM

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व उघड्यावर लघवी करणाऱ्या २३८४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमनपा उपद्रव शोध पथकाची कामगिरी : मनपा मुख्यालय परिसरातही ११० जणांकडून दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व उघड्यावर लघवी करणाऱ्या २३८४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दहाही झोनमधील पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते १० ऑक्टोबर २०१९ दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सिव्हील लाईन्स येथील मनपा मुख्यालय परिसरातही उपद्रव शोध पथकाद्वारे अशा ११० जणांवर कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला आहे.मनपा आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे स्क्वॉड लिडर वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करुन शहर विद्रुप करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे उपद्रव शोध पथक तैनात करण्यात आले आहे. झोन स्तरावर पथकाची नेमणूक करण्यात आली असून पथकामध्ये ८७ जणांचा समावेश आहे.उपद्रव शोध पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते १० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १०५२ जणांवर कारवाई करुन ९५ हजार ८०० रुपये दंड वसूल केला तर उघड्यावर लघवी करणाऱ्या १३३२ जणांकडून २ लाख ९ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दोन्ही कारवाईमध्ये एकूण २३८४ जणांकडून ३ लाख ५ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.हनुमान नगर, लक्ष्मीनगर व गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक कारवाईउपद्र्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबाबत सर्वाधिक कारवाई हनुमान नगर झोनमध्ये तर उघड्यावर लघवी करण्याबाबत लक्ष्मीनगर व गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. हनुमान नगर झोनमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या सर्वाधिक २८९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. लक्ष्मीनगर झोनमध्ये १५९, गांधीबाग झोनमध्ये ११७, धरमपेठ झोनमधील ११५, आसीनगर झोनमध्ये ९५, लकडगंज झोनमधील ९१, धंतोली झोनमध्ये ८७, मंगळवारी झोनमधील ६२, नेहरु नगर झोनमधील २७ व सतरंजीपुरा झोनमधील १० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. लक्ष्मीनगर व गांधीबाग झोनमध्ये उघड्यावर लघवी करणाºया प्रत्येकी २५५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या पाठोपाठ धंतोली झोनमध्ये २१०, मंगळवारी झोनमध्ये १४९, धरमपेठ व लकडगंज झोनमध्ये प्रत्येकी ११४, आसीनगर झोनमध्ये १०८, हनुमान नगर झोनमध्ये ७१, नेहरू नगर झोनमध्ये ४५ व सतरंजीपुरा झोनमध्ये ११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहननागपूर शहर संपूर्ण देशात सुंदर शहर म्हणून ख्यातिप्राप्त होत आहे. आपले शहर हिरवे, सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यात नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याकडून कुठलाही उपद्रव होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घ्यावी आणि असे काही आढळल्यास त्वरित महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथक किंवा स्वच्छता विभागाकडे माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका