लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धरमपेठ भागातील दुकानदारांनी फूटपाथ, रस्त्यावर बॅनर, पोस्टर, होर्डिंगच्या माध्यमातून केलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई आज सीताबर्डी पोलिसांनी केली.आपले घर, परिसर घाण आणि अतिक्रमणापासून दूर ठेवल्यास शहर, राज्य आणि देशात ही समस्या दूर होऊ शकते. हेच ध्येय बाळगून नागपुरातील काही जागरुक नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी धरमपेठ भागातील नागरिकांनी ‘सिव्हीक अॅक्शन ग्रुप’ (सीएजी) तयार केला आहे. या ग्रुपने अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे तक्रार केली. परंतु हे अतिक्रमण हटविण्याचे काम महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने केले नाही. अखेर सीएजी ग्रुपने सीताबर्डी पोलिसात तक्रार केली. त्याचा परिणाम असा झाला की, गुरुवारी सायंकाळी सीताबर्डी पोलिसांनी धरमपेठ परिसरातील दुकानदारांनी बॅनर, पोस्टर, होर्डिंगच्या माध्यमातून रस्त्यावर, फुटपाथवर केलेल्या अतिक्रमणावर कारवाई केली. सीताबर्डीचे पोलीस निरीक्षक हेमंत खराबे यांच्या नेतृत्वात केलेल्या या कारवाईत जवळपास १० पोलीस कर्मचारी सहभागी झाले. पोलिसांनी झेंडा चौक ते कॉफी हाऊस चौकाच्या दिशेने जाणाºया रस्त्यावर अतिक्रमण हटविणे सुरु केले. येथे मोबाईल शोरूमचे फूटपाथवरील लोखंडाच्या अँगलच्या साहाय्याने लावलेले मोठे बोर्ड हटविण्याची विनंती पोलिसांनी दुकानदारांना केली. येथे एक मुव्हेबल बोर्डही हटविण्यात आले तसेच झाडावर लटकविलेले बोर्डही काढण्यात आले. पुढे एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे बोर्डही हटवून त्याचा लोखंडी पाईप जप्त करण्यात आला. तेथून पोलीस लक्ष्मीभुवन चौकाकडे वळले. येथेही दुकानदारांनी बोर्ड, पोस्टर, बॅनरसह इतर मार्गाने केलेले अतिक्रमण पोलिसांनी हटविले. येथे काही दुकानदारांनी त्याचा विरोध केला. त्यामुळे पोलीस आणि दुकानदारात वाद झाला. परंतु पोलीस निरीक्षक हेमंत खराबे यांनी दुकानदारांना सांगितले की, धरमपेठच्या नागरिकांच्या तक्रारीवरूनच पोलीस ही कारवाई करीत आहेत. त्यानंतर दुकानदार शांत झाले. ही कारवाई जवळपास तीन तास चालली.परिसर अतिक्रमणमुक्त ठेवणे दुकानदारांचीही जबाबदारीधरमपेठच्या सिव्हीक अॅक्शन ग्रुपच्या पदाधिकाºयांच्या मते आपला परिसर अतिक्रमणापासून मुक्त ठेवण्याची जबाबदारी दुकानदारांचीही आहे. त्यांनी आपल्या दुकानातील साहित्य, बोर्ड, बॅनर दुकानाच्या परिसरातच ठेवल्यास रस्ते, फुटपाथ अतिक्रमणमुक्त होऊन पायी चालणारे, वाहनचालकांना ये-जा करण्यास सुविधा होईल. वाहन ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल. त्यामुळे दुकानात ग्राहकांची संख्याही वाढण्यास मदत होईल.
धरमपेठेतील अतिक्रमणावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 1:18 AM
धरमपेठ भागातील दुकानदारांनी फूटपाथ, रस्त्यावर बॅनर, पोस्टर, होर्डिंगच्या माध्यमातून केलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई आज सीताबर्डी पोलिसांनी केली.
ठळक मुद्देसिव्हीक अॅक्शन ग्रुपच्या तक्रारीवरून राबविली मोहीम