शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

एफडीएची कारवाई : ४५ लाख रुपयांचे खोबरे, विलायची जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 12:52 AM

विनापरवाना घाऊक व्यापार आणि निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री करीत असल्याच्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शुक्रवारी अमरावती रोड, वडधामना येथील जय बजरंगबली एन्टरप्राईजेस या वितरकाच्या गोडाऊनची तपासणी करून ४५ लाख ४३ हजार रुपयांचा साठा जप्त केला.

ठळक मुद्देविनापरवाना व्यवसाय, भेसळयुक्त साठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विनापरवाना घाऊक व्यापार आणि निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री करीत असल्याच्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शुक्रवारी अमरावती रोड, वडधामना येथील जय बजरंगबली एन्टरप्राईजेस या वितरकाच्या गोडाऊनची तपासणी करून ४५ लाख ४३ हजार रुपयांचा साठा जप्त केला.रामकृपाल चंद्रभान सिंग असे पेढीचे मालक असून त्यांच्या गोडावूनमध्ये खोबरे (कोकोनट) आणि विलायची या अन्नपदार्थांचा साठा विक्रीसाठी साठविल्याचे आढळून आले. त्यांनी विक्रीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेतला आहे. भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून ४१ लाख १४ हजार ११४ रुपये किमतीचे २३,९९८ किलो खोबरे आणि ४ लाख २९ हजार ३४० रुपये किमतीची १०४८ किलो विलायची असा एकूण ४५ लाख ४३ हजार ४५४ रुपये किमतीचा साठा कायद्यानुसार सिंग यांच्या गोडावूनमध्ये जप्त करून सीलबंद करण्यात आला. या साठ्यातून दोन नमुने विश्लेषणासाठी घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अन्न व्यवसाय चालकावर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) अभय देशपांडे, अन्न सुरक्षा अधिकारी किरण गेडाम आणि महेश चहांदे यांनी केली. जनआरोग्याचा विचार करता या प्रकारची धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. विनापरवाना व्यवसाय करताना व्यापारी आढळल्यास अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे केकरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :FDAएफडीएraidधाड