नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) काही सफाई कर्मचारी स्वत: काम न करता दुसऱ्यांकडून ५० ते १०० रुपये रोजंदारीने काम करून घेत असल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. यावर अधिष्ठात्यांनी स्पष्ट केले की, जे काम करणार नाही त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. याची संपूर्ण जबाबदारी वैद्यकीय अधीक्षकांवर सोपविण्यात आली आहे.मेयोमध्ये वर्ग चारच्या अनेक कर्मचाऱ्यांकडून कामचुकारपणा सुरू आहे. साधारण ३० ते ४० असे सफाई कर्मचारी आणि अटेडंट आहेत जे कार्यालयातच येत नाही. त्यांनी आपल्या जागेवर अन्य लोकांना कामावर ठेवले आहे. यासाठी ते दरमहा किंवा प्रतिदिन हिशेबानुसार पैसे देतात. या संदर्भातील वृत्त प्रकाशित होताच अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांनी या प्रकरणाला गंभीरतेने घेतले. त्यांनी चौकशी समिती स्थापन केली. समितीने नुकतचा अहवाल सादर केला आहे.या पूर्वी दिल्या नोटीसचौकशी अहवालाला घेऊन डॉ. वाकोडे यांनी सांगितले, हे प्रकरण मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. यापूर्वी चौकशी झालेल्या आहेत. कामचुकारपणा करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या असून काहींना मेडिकल बोर्डाच्यासमोरही उभे केले आहे. (प्रतिनिधी)
काम न करणाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: April 08, 2015 2:39 AM