लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेले नियम तोडणाऱ्या शाळांवर चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी एनएमआरडीएच्या प्रशासनाला दिले.बेसा रोडवर पोद्दार इंटरनॅशनल या सीबीएसई शाळेच्या व्हॅनला शनिवारी अपघात झाला. या अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले. त्या पार्श्वभूमीवर या शाळेला पालकमंत्री बावनकुळे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नियमानुसार या शाळेला सर्व्हिस रोड नसल्यामुळे अपघात झाल्याचे लक्षात आले आहे. या शाळेसह जिल्ह्यातील सुरक्षेचे नियम तोडणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. शाळेसारख्या संस्था मुख्य रस्त्यांवर असतील तर त्यांना सर्व्हिस रोड तयार करणे आवश्यक आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.सर्व्हिस रोड बांधल्याशिवाय शाळेची इमारत बांधता येत नाही. तरीही पोद्दार इंटरनॅशनल या शाळेने नियम धाब्यावर बसवून शाळेचे बांधकाम केले. एनएमआरडीच्या अधिकारक्षेत्रात ही शाळा असल्यामुळे सर्व प्रकारची पाहणी करून चौकशी करण्याचे निर्देश देऊन शाळेला नोटीस देण्याच्या सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी मिळालेल्या माहितीनुसार ९० टक्के शाळांनी सर्व्हिस रोड बांधलेले नाहीत. तसेच बेसा घोगली वेळा हा रस्ताही प्रस्तावित करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.हा अपघात झाला तेव्हा टिप्परच्या चालकाचा तोल सुटला व टिप्परने पोद्दार शाळेच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कूल व्हॅनला धडक दिली. या व्हॅनमधून विद्यार्थी खाली उतरत असतानाच टिप्परने घडक दिली. चार विद्यार्थी जखमी झाले, तर एकाला जास्त इजा झाली. या बांधकामाला वेळाहरी ग्रामपंचायतीने परवानगी दिली असल्याचे सजमते.
सुरक्षेचे नियम तोडणाऱ्या शाळांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 9:31 PM
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेले नियम तोडणाऱ्या शाळांवर चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी एनएमआरडीएच्या प्रशासनाला दिले.
ठळक मुद्देपोद्दार शाळेला पालकमंत्र्यांची भेट : जखमी विद्यार्थ्यांची केली विचारपूस